नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा
मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेचे 11 वे वर्ष
२७ ऑगस्टला मालवण बंदर जेटीवर रंगणार सांस्कृतिक सोहळा
मंगेश नलावडे | मालवण : नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक नारळ लढवणे स्पर्धेचे यंदा अकरावे वर्ष असून, या सांस्कृतिक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने २०१६ पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी मेन गेट, कस्टम ऑफिस शेजारी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर महिलांच्या नारळ लढवणे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा रंगणार असून, जिल्ह्यातील नामवंत नृत्यकलाकारांकडून कोळी नृत्याचे सादरीकरण तसेच जादूगार निखिल यांचा जादूचा शो हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची मेजवानी नारळ लढवणे स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी यंदा आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांक : फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ, १० लाख रुपयांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट.
द्वितीय क्रमांक : मिक्सर, पैठणी, सोन्याची नथ, १० लाख रुपयांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट.
तृतीय क्रमांक : कुकर, पैठणी, चांदीची पैंजण आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट.
चतुर्थ क्रमांक : गॅस शेगडी, पैठणी, चांदीची पैंजण आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना नारळ मंडळाच्या वतीने मोफत देण्यात येणार आहेत.
महिला-भगिनींसाठी लकी ड्रॉचेही आयोजन स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महिला-भगिनींना सामाजिक संदेश असलेली कुपने देण्यात येणार असून, या कुपनमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. लकी ड्रॉमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आर्या हेल्थ क्लबच्या माध्यमातून तीन दिवसीय ऑनलाइन मोफत ट्रायल तसेच आरोग्यविषयक मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
तीन वेळा प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या महिलेला सोन्याचा हार या स्पर्धेत सहभागी होऊन एखाद्या महिलेने तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावल्यास विशेष प्रावीण्य म्हणून ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेबाबत महिला-भगिनींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
बक्षिसांचे आज सादरीकरण
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला मोठ्या प्रमाणात महिला-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. आज हॉटेल राजभोग, बंदर जेटी येथे स्पर्धेतील बक्षिसांचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, सदस्य देवानंद लुडबे, शुभदा पाडगावकर, रेश्मा खंदारे-नागवेकर, आर्या मुणगेकर, कोळंब सरपंच सिया चेतन धुरी, वायरी उपसरपंच प्राची पराग माणगावकर, स्नेहल मेथर, मंडळाच्या सल्लागार नोटरी वकील अमृता मोंडकर, रुद्राक्ष कांदळकर, अवनीश मेथर यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या पारंपरिक स्पर्धेला नागरिकांच्या आणि महिला-भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दरवर्षी मोठे स्वरूप प्राप्त होत आहे. यंदाही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक परंपरेचा आनंद घ्यावा, असे आवाहन मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांनी केले आहे.

विजेत्यांना फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ, १० लाख रुपयांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट ; अन्य बक्षिसांची ही बरसात
