Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

महसूल दिनानिमित्त मालवण तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांचा गौरव...!

महसूल दिनानिमित्त मालवण तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांचा गौरव...!


 मंगेश नलावडे | मालवण : महसूल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुणगौरव सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व घटकांचा त्यांच्या कार्याची दखल घेत प्रशस्तीपत्रक देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात मालवण तालुक्यात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच ऑनलाईन धान्य वितरण सेवे मध्येही चांगले काम केलेल्या रेशन दुकानदारांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये मालवण तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तथा रेवंडी येथील रेशन दुकानदार अमित गावडे, वॉर्ड क्रमांक ४ येथील धान्य दुकानदार सिद्धेश मलये, मालवण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या नांदरुख येथील धान्य दुकानाचे दत्ता टक्के, वॉर्ड क्रमांक ६ चे विरेश पाताडे, वॉर्ड क्रमांक ७ चे सत्यविजय ढोलम, मठबुद्रुक येथील धान्य दुकानदार संजय सावंत, कट्टा येथील लीना डान्टस, वायंगणी येथील सुशांत आसोलकर आणि मोगरणे येथील सुंदर फोपळे यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, श्रीमती आरती देसाई, मालवण तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती शीला निकस, पुरवठा अव्वल कारकून विशाल कापसे, सचिन पाटील यांच्यासह मालवण तालुका रेशन दुकान संघटनेचे सल्लागार कमलाकांत कुबल, उपाध्यक्ष बाळकृष्ण लुडबे, विलास पांजरी तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने धान्य दुकानदार उपस्थित होते.

रेशन वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना शासनाच्या धान्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या दुकानदारांचा झालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरला. या गुणगौरवामुळे मालवण तालुक्यातील रेशन दुकानदारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.

ruchira top