Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण..

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण..

शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांचे सौजन्य

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत सामाजिक उपक्रम

मालवण | प्रतिनिधी :
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील १०० गरजू विद्यार्थ्यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांच्या सौजन्याने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.


नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सामाजिक दातृत्वासह नवी मुंबई शिवसेना उपशहरप्रमुख महेश (बाबा) परब व नरेश गोविंद परब यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही या उपक्रमास सहकार्य लाभले.


यावेळी आमदार निलेश राणे यांनी किशोर पाटकर यांच्या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले. किशोर पाटकर हे विविध ठिकाणी निःस्वार्थ भावनेने सामाजिक सेवा कार्य करत असून, गरजू विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि प्रगतीला हातभार लावणाऱ्या अशा उपक्रमांसाठी पाटकर यांचे मनापासून आभार मानतो, असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.


संस्था सचिव सुनील नाईक यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे संस्थेला नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्याचप्रमाणे आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे हेही संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खासदार, आमदार व पालकमंत्री सातत्याने सहकार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. शतकोत्सव साजरा करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आजवरच्या शैक्षणिक वाटचालीचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच किशोर पाटकर यांचेही आभार व्यक्त केले.


आमदार निलेश राणे यांचे उत्स्फूर्त स्वागत प्रशालेत करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदैव सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी स्वर्गीय संजय नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक संकल्पना निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आमदार राणे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या गतिमान व यशस्वी कार्याचा विशेष उल्लेख केला. कट्टा शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचेही त्यांनी कौतुक केले. तसेच किशोर पाटकर यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमास शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, संस्था सचिव सुनील नाईक, उपाध्यक्ष तथा कट्टा-गुरामवाडचे सरपंच शेखर पेणकर, खजिनदार शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक महेश भाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपा सावंत, विश्वास गावकर, अरविंद करलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर,शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, विभागप्रमुख राजन माणगावकर, समाजकल्याण माजी सभापती बाळ महाभोज, उपसरपंच आबा कामतेकर, कृषी समिती अध्यक्ष प्रताप चव्हाण, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, शेखर फोंडेकर, दया देसाई, समीर रावले, देवेंद्र नाईक, नाना गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर सर व वीणा मयेकर मॅडम यांनी केले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top