Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रे नगरपरिषदेत सादर करावीत

दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रे नगरपरिषदेत सादर करावीत

मालवण नगरपरिषदेचे आवाहन; ५ टक्के निधीतून अर्थसहाय्याचे होणार वाटप

मालवण | प्रतिनिधी :  मालवण नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन योजनेंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सन 2026-27 यां आर्थिक वर्षामध्ये मालवण नगरपरिषदेने ५ टक्के निधी राखीव ठेवला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालवण नगरपरिषद कार्यालयाकडे एकूण १२८ दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झालेली आहे.

नोंदणी झालेल्या मात्र अद्याप दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या व्यक्तींनी आपले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत नगरपरिषद कार्यालयीन वेळेत नगरपरिषद कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या पात्र दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले आहे, अशा लाभार्थ्यांना शासन नियमानुसार व निर्धारित टक्केवारीनुसार उदरनिर्वाहासाठी निधीचे वाटप करण्यात येणार आहे. हा निधी संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर NEFT/RTGS द्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.

तसेच, मालवण नगरपरिषद हद्दीतील ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप नगरपरिषदेकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून दिव्यांग व्यक्ती म्हणून नोंदणी करून घ्यावी, असेही नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

सर्व संबंधित दिव्यांग बांधवांनी आवश्यक ती कार्यवाही करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top