Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

क्रांतिकारकांचे गुण आचरणात आणा!

क्रांतिकारकांचे गुण  आचरणात आणा!

शिवशंभो विचार मंच कोकण प्रांत सहसंयोजक भूषण साटम यांचे प्रतिपादन : वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे मार्गदर्शन 

मालवण | प्रतिनिधी :- ब्रिटिशांच्या जुलमी शृंखलात जखडलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपल्यासमोर संघटन, कठोर राष्ट्रप्रेम, एकात्मता, शिस्तपालन, वज्रनिश्चय, गुरुजनाचा आणि आपल्या संस्कृतीचा, धर्माचा अभिमान या सर्व गोष्टी ठेवल्या त्याच गोष्टी दुर्दैवाने लुप्त होतं आहेत. आपला भारत देश सुजलाम, सुफलाम बनवायचा असेल तर क्रांतिकारकांचे गुण आचरणात आणा. असे प्रतिपादन श्री शिवराज मंच अध्यक्ष आणि शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक भूषण साटम यांनी येथे बोलताना केले 

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मालवण येथे क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव व्हावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी इतिहास अभ्यासक आणि शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक श्री भूषण साटम यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, कट्टा केंद्रप्रमुख गौरव नाईक मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पालक शिक्षक संघाचे सदस्य गणेश वाईरकर, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख एकनाथ राऊळ, प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किसन हडलगेकर उपस्थित होते.

भुषण साटम म्हणाले, आम्हाला हे स्वातंत्र्य तयार स्वरूपात मिळाले आहे. पण या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्याचे स्मरण करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य आहे. भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, खु्दीराम बोस, अनंत कान्हेरे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिसिह नाना पाटील, सुभाषचंद्र बोस, वि दा सावरकर, बंगालच्या शांती घोष आणि सुनीता चौधरी, नागालँडची तेरा वर्षाची क्रांतिकारक राणी गड्डम्मा अश्या अनेक क्रांतिकारांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे.. कित्येकांची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत. या सर्वांचे स्मरण करताना आज आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आज ही आपल्या देशाला क्रांतीची गरज आहे आणि त्याची सुरवात विध्यार्थीदशेमधूनच झाली पाहिजे कारण विध्यार्थीच आजच्या भारत देशाच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान देऊ शकतो.

यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किसन हडलगेकर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाचे प्रमुख एकनाथ राऊळ यांनी केले.

ruchira top