Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कामाचा दर्जा कायम ठेवा..

कामाचा दर्जा कायम ठेवा..

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या सूचना

नगरपरिषदेच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर

मालवण | प्रतिनिधी :
मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला नगरपरिषदेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. खड्डेमुक्त मार्ग राहावेत. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नगरपरिषदकडून कामे प्रगतीपथावर सुरु आहेत. सुरु असलेल्या खड्डे बुजवणे कामाची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी पाहणी केली.


यावेळी नगरसेवक ललित चव्हाण उपस्थित होते. कामाचा दर्जा कायम ठेवा असे सांगत रस्त्यांची दुरुस्ती टिकाऊ पद्धतीने झाली पाहिजे, अशा सूचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी दिल्या.

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने शहरातील प्रमुख रस्ते, वर्दळीची ठिकाणे तसेच नागरिकांची मोठी ये-जा असलेल्या सर्वच मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजविण्यात येत आहेत. मागील काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने काम करण्यात अडचणी आल्या मात्र आता काम सुरु करण्यात आले आहे.

नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्तीची कार्यवाही हाती घेतली असून, उर्वरित आवश्यक ठिकाणीही कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार आहेत.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहाराच्या विकासासाठी, जन सेवेसाठी व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध असल्याचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top