मालवण: केंद्र सरकारच्या ‘मेरा युवा भारत’ स्वायत्त संस्था आणि वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने धुरीवाडा, मालवण येथील लक्ष्मीबाई देसाई टोपीवाला कन्याशाळेत ‘स्वच्छता पखवाडा २०२६’ चे औचित्य साधून विशेष स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. परिसर स्वच्छता आणि आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या प्रसंगी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण शिंदे सर, शिक्षिका वीणा नाईक मॅडम, शिपाई महादेव गावकर, तसेच वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनचे सदस्य अनिकेत गवंडी व भाग्यश्री मांजरेकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे संस्कार रुजवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.


