Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

एलआयसी मालवण शाखेला सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट..

एलआयसी मालवण शाखेला सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट..

करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन..

मालवण :
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या अकाऊंटन्सी व कॉमर्स विभागाच्या वतीने एफ.वाय.बी.कॉम., एस.वाय.बी.कॉम. आणि टी.वाय.बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) मालवण शाखेला 18 ऑगस्ट 2026 रोजी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीत वाणिज्य विभागाच्या एकूण 103 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


एलआयसीच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती हिना मुल्ला आणि श्री. सागर सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून एलआयसीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. श्री. सागर सूर्यवंशी यांनी एलआयसीमधील प्रशासकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परीक्षा, कौशल्ये व पात्रता याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.


एलआयसीचे विकास अधिकारी श्री. शैलेश पावसकर यांनी विद्यार्थ्यांना विकास अधिकारी तसेच एलआयसी एजंट म्हणून उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींची माहिती दिली. तसेच विम्याचे विविध प्रकार, त्यांचे महत्त्व आणि विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मालवण शाखेतील विविध विभाग प्रत्यक्ष दाखवून प्रत्येक विभागाचे कामकाज कशा पद्धतीने चालते, याचे सविस्तर विश्लेषण केले. श्री. शैलेश पावसकर हे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यामुळे या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा विशेष लाभ मिळाला. विकास अधिकारी श्री. शुभम गावडे यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.


या वेळी एलआयसीचे मुख्य आयुर्विमा सल्लागार दत्ताराम सावंत, बख्तियार खान, जगदीश खराडे, सच्चिदानंद गोलतकर तसेच विमा प्रतिनिधी सागर रेडकर व किरण वस्त उपस्थित होते.

एलआयसीच्या वतीने श्रीमती हिना मुल्ला यांनी डॉ. सुमेधा नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. देविदास हारगिले यांनी श्रीमती हिना मुल्ला यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, विविध विभागांची कार्यप्रणाली तसेच या क्षेत्रातील करिअरच्या संधी यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीची संधी उपलब्ध करून देऊन सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल अकाऊंटन्सी विभागप्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी एलआयसी मालवण शाखेचे तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

या क्षेत्रभेटीचे आयोजन डॉ. सुमेधा नाईक, डॉ. देविदास हारगिले, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. योगिता सावंत, प्राची गावडे आणि दुर्वा चव्हाण यांनी केले.

ruchira top