Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रामगड पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट समस्येबाबत जिल्हा अधीक्षकांशी सरपंच शुभम मटकर यांची चर्चा..

रामगड पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट समस्येबाबत जिल्हा अधीक्षकांशी सरपंच शुभम मटकर यांची चर्चा..

मालवण : रामगड पोस्ट ऑफिसमधील सेवांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हा अधीक्षक श्री. एन. टी. कुरळपकर यांची रामगडचे सरपंच श्री. शुभम मटकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. 

पोस्ट ऑफिसमधील बीएसएनएल लीज लाईनचा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने इंटरनेट सेवा सुरळीत होत नसून, त्याचा थेट फटका ग्रामस्थांना बसत आहे.

या समस्येमुळे विविध पोस्टाच्या सेवा मिळविण्यासाठी नागरिकांना वारंवार पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. याबाबत सरपंच शुभम मटकर यांनी जिल्हा अधीक्षक कुरळपकर यांचे लक्ष वेधले.

यावेळी श्री. कुरळपकर यांनी सदर लीज लाईनचा प्रस्ताव दिल्ली कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बीएसएनएल आणि खासगी इंटरनेट सेवा पुरवठादार यांच्यात करार झाल्यास रामगड पोस्ट ऑफिसला तातडीने इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रश्नावर जिल्हा स्तरावरून आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन श्री. कुरळपकर यांनी दिले.

रामगडसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांसह विविध शासकीय व टपाल सेवांसाठी पोस्ट ऑफिस महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पोस्ट ऑफिसची इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती सरपंच शुभम मटकर यांनी केली.

ruchira top