Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

धुरीवाडा मित्रमंडळातर्फे २१ ऑगस्टला भव्य नारळ लढविणे स्पर्धा

धुरीवाडा मित्रमंडळातर्फे २१ ऑगस्टला भव्य नारळ लढविणे स्पर्धा

प्रथम क्रमांकासाठी ११ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजारांचे पारितोषिक

मालवण | प्रतिनिधी : धुरीवाडा मित्रमंडळाच्या वतीने श्रीकृष्ण प्रसन्न उत्सवानिमित्त भव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी २ वाजता धुरीवाडा, मालवण येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या पारंपरिक स्पर्धेची रूपरेषा व बक्षिसे जाहीर करण्यात आली असून स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ११ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास ५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या दोन्ही पराभूत स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांकडून ५ नारळ देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी गट तयार करण्यात येणार असून प्रत्येक गटात चार खेळाडू असतील.

स्पर्धेच्या पुढील फेरीसाठी प्रत्येक गटातून एक पात्र स्पर्धक निवडला जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ४०० रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. पारंपरिक नारळ लढविण्याच्या या स्पर्धेमुळे धुरीवाडा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन धुरीवाडा मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धेचे ठिकाण : धुरीवाडा, मालवण, दिनांक : शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६, वेळ : दुपारी २ वाजता, प्रवेश फी : ४०० रुपये, प्रथम पारितोषिक : ११,००० रुपये
द्वितीय पारितोषिक : ५,००० रुपये, उपांत्य फेरीतील दोन्ही स्पर्धकांना : प्रत्येकी १,००० रुपये, आयोजक : धुरीवाडा मित्रमंडळ

▪️अमित खोत | मालवण

ruchira top