मालवण : मालवण शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन तालुका कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख शिरीष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.


जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांवर मनसे आगामी काळात तीव्र आवाज उठवणार असून, गणेशोत्सवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा होणार असल्याची माहिती शिरीष सावंत यांनी यावेळी दिली.
शिरीष सावंत यांनी सांगितले, घोषणा केलेली अनेक कामे प्रत्यक्षात झालीच नाहीत, तर काही कामे अद्याप अपूर्ण आहेत, असे सांगत यावेळी टीका करण्यात आली.



यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, शहराध्यक्ष सागर जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन बोडवे, विल्सन गिरकर, जेनिफर अन्ननसिएशन, सुरज पुजारे, संतोष सावंत, प्रसाद परब, प्रितेश सावंत, नारायण शिरोडकर, प्रसाद मेस्त्री, महेश गावडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : मयू पारकर | मालवण

