Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’मध्ये सिंधुदुर्गवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे..

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’मध्ये सिंधुदुर्गवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे..

सहभागींना टिशर्ट, टोपी, ईप्रमाणपत्र मिळणार

जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरीत आयोजन; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी :-
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी जलसंधारण दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडपासून या वॉकेथॉनला सुरुवात होणार असून, डॉन बॉस्को सर्कल, जिल्हा परिषद मुख्य गेट, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी नर्सिंग कॉलेज मार्गे पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड येथे वॉकेथॉनची सांगता होणार आहे. या उपक्रमात कमाल ३ किलोमीटर अंतराचे चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे. १५ वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांना या वॉकेथॉनमध्ये सहभागी होता येणार असून, सहभागी प्रत्येक व्यक्तीस टिशर्ट आणि वैयक्तिक किट, ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वॉकेथॉनसाठी क्यूआर आधारित ऑनलाइन नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माती आणि पाणी ही पुढील पिढ्यांची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. त्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, नागरिक आणि विविध संस्था यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही वॉकेथॉन लोकचळवळीचे प्रभावी माध्यम बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

नोंदणीसाठी लिंक : https://register.mahaevent.co.in/#/

ruchira top