Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

गेली १९ वर्षे अविरत उपक्रम सुरु असल्याची सल्लागार चंद्रकांत पाटकर यांची माहिती.


मालवण | प्रतिनिधी : विद्यार्थी मित्रानो मिळालेले यश तुमच्या कठोर परिश्रमांचे फलित आहे. शिक्षण आणि शिस्त हीच तुमच्या उज्ज्वल भविष्याची खरी ढाल आहे. त्यामुळे नेहमी सत्य आणि निष्ठेच्या मार्गावर चाला. यश मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन करून अभ्यास करा असे आवाहन हडी गावचे सुपुत्र सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधीर कदम यानी येथे केले.

फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, पदवी, स्पर्धा परीक्षा यातील 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हडी जठारवाडी शाळा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाला. यावेळी माजी सभापती उदय परब, अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, कोषाध्यक्ष प्रभाकर सुतार, सल्लागार चंद्रकांत पाटकर, किशोर नरे, कृषी सेवक विवेक रंगे, सोनाली कदम, शिक्षिका श्रीमती कुबल,श्रीमती मालंडकर, ओझर हाय. मुख्या. दीपक जाधव, सदस्य नंदकुमार पाटील, प्रज्ञा तोंडवळकर, सीमा शेटये, दिनकर सुर्वे, नंदकुमार पाटील, रमेश कावले, गुरुनाथ गावकर, प्रभाकर चिंदरकर, किशोर नरे, राणे सर, आंगणे मॅडम, पोलीस पाटील तृप्ती हडकर, दिनेश सुर्वे, श्रीमती पांजरी तसेच ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वागत अध्यक्ष देविदास सुर्वे यानी स्वागत केले. यावेळी माजी सभापती उदय परब म्हणाले, हडी जेष्ठ नागरिकांचे विविध उपक्रम अनुकरणीय असतात. सर्वांनी आपली एकी अशीच कायम ठेवावी. यश मिळविणे सोपे आहे पण टिकवणे कठीण असते. हडी गावात होणारा हा गुण गौरव कार्यक्रम म्हणजे जेष्ठ नागरिकांची कौतुकाची थाप आहे असे सांगितले.

विवेक रंगे म्हणाले, विध्यार्थी चुकीच्या मार्गाने जात आहेत. ध्येय निश्चित करण्याची मानसिकता कमी होत आहे. मोबाइल मध्ये जास्त न अडकता कामा पुरता मोबाईल वापरा. वृद्धाना योग्य तो मान सर्वांनी द्यावा असे आवाहन केले. मान्यवरानी मनोगत व्यक्त केले. सल्लागार चंद्रकांत पाटकर यानी गेली 19 वर्ष हा गुणगौरव कार्यक्रम अविरत चालू असल्याचे प्रस्ताविक करताना सांगितले. प्रस्ताविक व आभार चंद्रकांत पाटकर यांनी मानले.


फोटो : हडी येथे गुणवंत विध्यार्थी गुणगौरव करताना उपस्थित सेवानिवृत पोलीस निरीक्षक सुधीर कदम, संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे, माजी सभापती उदय परब, चंद्रकांत पाटकर व अन्य

ruchira top