Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

भाऊ-बहिणीचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश!

भाऊ-बहिणीचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश!

आराध्य व लेईशा पराडकर भावंडांची चमकदार कामगिरी

मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांकासह जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान

मालवण | प्रतिनिधी : शिष्यवृत्ती परीक्षेत एकाच कुटुंबातील भाऊ-बहिणीने प्रत्येकी २४२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोळंब कातवड शाळेचे मुख्याध्यापक नारायण केशव पराडकर व मालवण पंचायत समिती ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक वर्षा नारायण पराडकर यांचा मुलगा आराध्य आणि मुलगी लेईशा यांनी ही उज्ज्वल व चमकदार कामगिरी केली आहे.

इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आराध्य पराडकर जि. प. शाळा रेवतळे, याने २४२ गुण मिळवत शहरी सर्वसाधारण गटाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत लेईशा पराडकर अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल हिनेही २४२ गुण मिळवत शहरी सर्वसाधारण गटाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
जिल्हा परिषद रेवतळे शाळेचे मुख्याध्यापक देविदास प्रभूगावकर, उपशिक्षक महादेव घोडके सर यांचे आराध्याला मार्गदर्शन लाभले. तसेच लेइशा हिला टोपीवाला हायस्कूल च्या शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तापूर्ण यश मिळविल्याने पराडकर कुटुंबाच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर यांनी शाळेत जाऊन दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच गटविकास अधिकारी परागिणी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, सदस्य दीपक चव्हाण, माजी गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर, गडचिरोली गटविकास अधिकारी आत्मज मोरे, माजी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी व कोळंब केंद्रप्रमुख प्रशांत पारकर यांच्यासह नातेवाईक, शिक्षक व मित्रपरिवाराने आराध्य व लेईशाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top