Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

....म्हणूनच माजी आमदार वैभव नाईकांच्या अपयशाचा पाढा आम्हीच नव्हे तर जनता ही कायमच वाचणार..

....म्हणूनच माजी आमदार वैभव नाईकांच्या अपयशाचा पाढा आम्हीच नव्हे तर जनता ही कायमच वाचणार..

ठाकरे गटाच्या राधिका मोंडकर यांनी वैभव नाईक यांच्या अपयशाचा फॅक्टर झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये

तुम्हाला पण त्यांच्याच प्रमाणे जनतेने नाकारले निवडणुकीत पराभूत केले याचे थोडे तरी भान ठेवा

शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांचे ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर

मालवण | प्रतिनिधी :
मालवण नगरपरिषदेच्या कारभारावर नाहक टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवक यांनी जोरदार हल्लाबोल केला. याचवेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागील दहा वर्षातील अपयशी कारभाराचा पाढा ही वाचण्यात आला. अपयशी कारभाराचा पंचनामाच करण्यात आला. या बोचऱ्या टिकेमुळे सैरभैर झालेल्या ठाकरे गटाने ओढून ताणून बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांच्या शहराध्यक्ष राधिका मोंडकर यांनी मांडलेली बाजूही लंगडी पडली आहे. अशी टीका शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी ठाकरे गटावर केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नगरसेविका भाग्यश्री मयेकर म्हणाल्या, माजी आमदार वैभव नाईक यांच्या काळात कामे झालीच नाहीत, रखडलेल्या कामांची यादी ही मोठीच आहे. त्यामुळे वैभव नाईक यांच्या अपयशी कारभाराचा उल्लेख होतच राहणार. त्याला कोणीच नाकारू शकत नाही. म्हणूनच जनतेने त्यांना पराभूत केले.

तरीही त्यांच्या काळात काही किरकोळ कामे झाली असे ठाकरे गट व राधिका मोंडकर तुम्ही म्हणत असाल तर त्यांच्या कार्यकाळात न झालेल्या व रखडलेल्या प्रलंबित स्वरूपातील यादी खूप मोठी आहे त्या कामाची पण जबाबदारी घ्या.

अहो मोंडकर तुम्ही आत्ताच पदावर आलात. कुठलीही शहानिशा न करता कुणी तरी ओढून ताणून लिहून दिलेले छापून स्वतःची पाठ स्वतःच थोपटुवून मिरवू नका. नाही तर राजकारणात जोरका झटका कसा लागतो हे तुम्ही नगरपरिषद निवडणुकीत अनुभवले आहात.

मागील 11 वर्षाच्या कालावधीत जर आपल्या माजी आमदारांनी आपल्या मतदार संघात खरोखरच उल्लेखनीय काम केले असत तर जनतेने त्यांना आणि तुम्हालाही पराभूत केले नसते.

अहो खोटे बोला पण रेटून बोला हा ठाकरे गटाचा गुण तुम्हाला पण लागलेला दिसतोय. मात्र वेळीच सावध व्हा. जनता सुज्ञ आहे. आपल्या कार्याचे मूल्यमापन हि जनता करत असते. कुडाळ मालवणच्या जनतेनेच वैभव नाईक यांना माजी केले आहे.

मालवण नगरपरिषदे मध्ये आपल्या माजी आमदारांचा प्रभाव दिसला नाही. राजकीय वजन नसल्याने पाठपुरावा कमी पडल्याने प्रलंबित राहिलेल्या कामाचे आकडे वाढले. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे राजकारण तुम्ही सुरु केले आहे. जनतेने निवडून दिलेले आम्ही सत्ताधारी अपयशी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. स्वतःच्या अपयशचे खापर आठ महिन्यापूर्वी नगरपरिषदेत सत्तेत आलेल्या आमच्या माथी मारण्यासाठी उपोषण नौटंकी करून जनतेची दिशाभूल करणे आता थांबवा. आपल्या काळात मालवण नगरपरिषद मध्ये प्रस्तावित मत्स्यालय निधी परत का गेला ?, आपल्या 11 वर्षाच्या कालावधीत भुयारी गटार योजना का पूर्ण झाली नाही ?, मालवण नगरपरिषद सफाई कामगार संकुल का रखडलं ?, आपल्या कालावधीतील भाजी मार्केट अजून का पूर्ण झालं नाही ?, आपल्या कालावधीत प्रस्तावित झालेल्या नळपाणी योजनेला मंजुरी साठी सहा वर्ष का लागली ? हे सगळे प्रश्न आपल्या माजी आमदारांना विचारा. आणि उपोषण करायची तुमच्या काही नगरसेवकांना हौस असेल तर माजी आमदार वैभव नाईक यांच्याच घरा बाहेर बसा. रखडलेल्या कामांचा जाब विचारा. तेव्हा आता सारखे तुमचेच 10 लोक नव्हे तर शेकडोच्या संख्येने जनताही तुमच्या सोबत वैभव नाईक यांना जाब विचारण्यासाठी उपस्थित असेल.

खरं तर सगळे प्रश्न अपयशी कारभाररामुळे प्रलंबित राहिले असताना ए आय व्हिडिओ चा वापर करून आपल्या माजी आमदारांचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न तुमच्या गटाचे नगरसेवक करत आहेत. मोंडकर तुमची भूमिका पण दुटप्पी आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे. कारण एका बाजूने स्वच्छते बाबत टीका करायची आणि आमच्याच नगरसेवकांसोबत स्वच्छता मोहिमेत ही सहभागी होवून फोटो सेशन करायचे . त्यामूळे मोंडकर मॅडम आपण इतरांच्या ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा मालवणच्या भल्यासाठी काही करत असाल तर ते सामाजिक कार्य करा. अन्यथा राजकारणात आपण नवीनच डाव सुरू करायला बघत आहात तो अर्धवट सोडण्याची पाळी यायला देऊ नका हा आमचा सबुरीचा सल्ला.

मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे साहेब कटीबद्ध

विकासाचे व्हिजन असावे लागते, निधी खेचून आणण्याची धमक असावी लागते. ती धमक आमदार निलेश राणे यांच्यात आहे. म्हणूनच जनतेने मोठया विश्वासाने त्यांना निवडून दिले. कोट्यावधी निधी मंजूर करून आणून आमदार निलेश राणे यांनी मालवण शहर विकासाच्या गतिमान विकासाची दमदार सुरवात केली आहे. मागील दहा वर्षात जेवढा निधी आला नाही त्यापेक्षा जास्त निधी आमदार निलेश राणे यांनी वर्षभरात आणला. रखडलेल्या प्रकल्पना गती देण्याचे काम केले. मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे साहेब कटीबद्ध आहेत. असेही भाग्यश्री मयेकर यांनी सांगितले.

ruchira top