Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण नगरपरिषद सत्तधाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टिकेला ठाकरे गट मालवण महिला शहरसंघटीका राधिका मोंडकर यांचे प्रत्युत्तर

मालवण नगरपरिषद सत्तधाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टिकेला ठाकरे गट मालवण महिला शहरसंघटीका राधिका मोंडकर यांचे प्रत्युत्तर

मालवण : कालपर्यंत आमदार वैभव नाईक यांच्या सोबत असलेल्यांना देखिल आज केवळ 'पक्ष बदलल्याने' वैभव नाईक यांच्यावर नाईलाजाने प्रोटोकॉल म्हणून टीका करताना खरंच खूप 'वाईट' वाटत असेलच..... कारण लोकांना ते ऐकताना वाटलंय अशा प्रतिक्रिया आहेत. सध्याच्या सत्ताधारी व्यक्तिंना प्रश्न विचारल्यावर जर गतकाळाचा आधार घ्यावा लागत आहे. अशी भूमिका ठाकरे गट मालवण महिला शहरसंघटीका राधिका मोंडकर यांनी स्पष्ट केली आहे.


ठाकरे गट मालवण महिला शहरसंघटीका राधिका मोंडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, माजी आमदार वैभव नाईक....किंवा श्री. वैभव नाईक. निवडणुकीतील पराजयानंतर ज्यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेत स्वतःला 'माजी आमदार' सुद्धा म्हणू नका असं आवाहन केलं होतं.

आमदारकीच्या कालावधीत, श्री. वैभव नाईक यांच्या कार्याची श्रृंखला ग्राऊंडवर काहीशी अपूर्णच भासेल कारण त्यांच्या पहिल्या आमदारकीचा काळ हा केंद्र व राज्याच्या उचित् संख्या समन्वयाच्या अभावाचा ठरला आणि दुसरा टप्पा नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनानी विस्कटलेला होता. अर्थात् हे सगळे घटक सबब न बनवता आणि ते घटक केवळ कागदावरच ठेवून सलग ११ वर्षे स्वतःच्या मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी झटलेला माणुस म्हणजे माजी आमदार वैभव नाईक म्हणणं उचित् ठरेल...!

कोरोना कालावधीपूर्वी प्रस्तावित व मंजूर झालेली कामे, कोरोना कालावधी दरम्यान माणसा माणसांची कामे आणि प्रशासकीय कालावधीत इतरत्र अक्षरशः टाळेबंदी असताना कुडाळ - मालवण मतदार संघाने घेतलेला सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य विषयक श्वास हा केवळ माजी आमदार वैभव नाईक यांच्या सजग तरिही मानवी मुक्ततेची गरज जाणून सांभाळलेला काळ होता. प्रशासकीय कालावधीत नगरपरिषद प्रशासनाकडून मूलभूत व दैनंदिन अत्यावश्यक सेवांवर देखरेख ठेवताना त्यांच्या माध्यमातून त्याही परिस्थितीत असंख्य युवा कार्यकर्ते घडले....जे आज इतर विविध पक्षात पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नेते म्हणूनही कार्यरत आहेत.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कोरोनाच्या सावटातून सुटताना आणि पावसाची ९०% शक्यता असताना नगरपरिषद व जिल्हा नियोजन मार्फत भरवलेला 'दांडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव २०२२' हा तत्कालीन समस्त महाराष्ट्र व देशवासियांसाठी एक 'आदर्श सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव माॅडेल' म्हणून नावाजला जातो. छोट्या छोट्या व्यावसायिक, कलावंत आणि होतकरुंना आत्मबळ द्यायचं कार्य वैभव नाईक यांनी 'न बोलता' केलेलं आहे व आजही सुरू आहे.

त्या कालावधीत मच्छि मार्केट, भाजी मार्केटच्या समस्या प्रशासनावर दबाव आणून करता येणं शक्य नव्हता कारण काळच 'बिथरलेल्या व कमी मनुष्यबळाचा' होता तरिही तत्कालीन शिवसेना शाखेमध्ये भीतीचे सावट नव्हते. नूतन बंदरजेटी असो, किल्ले सिंधुदुर्गवरचे सिंहासन असो, कचरा संदर्भात जागृती असो किंवा भर पावसात तुंबलेल्या गटारांच्या प्रश्नांबाबत मुख्याधिकारी महाशयांसह कंत्राटदाराला रस्त्यावर आणून विचारलेला जाब असो....वैभव नाईक सदैव 'मालवणात' होते. दुचाकीवरुन देखिल हवं तिथे पोचायची तयारी ठेवून होते...पोचत होते. तौक्ते वादळात तर अंगात टी शर्ट घालून स्वतःच्या आवारातली साफसफाई केल्यासारखा ते शहरभर जातीने सक्रीय होते आणि एका आमदाराला वीजेच्या तारादेखिल स्वतः उचलून गुंडाळताना समस्त 'मालवणने' पाह्यले होते..! माजी आमदार वैभव नाईक यांच्या अभ्यासू व दूरदर्शी कालावधीतच कुत्र्यांचे निर्बिजीकरण, कचरा विषयक तांत्रिक सक्षमीकरण, व्यापारी बांधवांसोबत अग्नीशमन वाहनांचे उद्गाटन, बीच क्लिनींग मशीन व्हेइकल, मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीचा संपूर्ण आराखडा, आडारी - धुरीवाडा येथील सुशोभिकरण वगैरे अनेक कामे मार्गी लागत होती.

कोणताही मंत्री पाठिशी नसताना त्यांचे 'तारांकित प्रश्न' सभागृहात संस्मरणीय ठरत होते. सहज वावर आणि कुठलाच बढ़ेजाव नसल्याने वैभव नाईक यांचा प्रशासनासोबत जनतेशी संवाद हा 'विना तालमीचा' होता....थेट होता.

कालपर्यंत आमदार वैभव नाईक यांच्या सोबत असलेल्यांना देखिल आज केवळ 'पक्ष बदलल्याने' वैभव नाईक यांच्यावर नाईलाजाने प्रोटोकॉल म्हणून टीका करताना खरंच खूप 'वाईट' वाटत असेलच.....कारण लोकांना ते ऐकताना वाटलंय अशा प्रतिक्रिया आहेत.
सध्याच्या सत्ताधारी व्यक्तिंना प्रश्न विचारल्यावर जर गतकाळाचा आधार घ्यावा लागत असेल तर पुन्हा 'वैभव नाईकच जिंकलेत' असा संदेश स्पष्टपणे जातोय... असे मालवण महिला शहरसंघटीका
राधिका मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

ruchira top