Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कुंभारमाठच्या सौंदर्यात भर ; दोन आकर्षक सेल्फी पॉइंटचे लोकार्पण..

कुंभारमाठच्या सौंदर्यात भर ; दोन आकर्षक सेल्फी पॉइंटचे लोकार्पण..

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीचा पर्यटनपूरक उपक्रम

पर्यटकांसह ग्रामस्थांसाठी आकर्षणाचे केंद्र

मालवण | प्रतिनिधी :
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कुंभारमाठच्या वतीने गावाच्या सौंदर्यात आणि पर्यटन विकासात भर घालणाऱ्या दोन आकर्षक सेल्फी पॉइंटचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. गावातील पर्यटनाला चालना देणे आणि सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन श्रीकृष्ण वालावलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर ग्रामपंचायत कुंभारमाठ परिसरात येथे उभारण्यात आलेल्या दुसऱ्या आकर्षक सेल्फी पॉइंटचे उद्घाटन मधुकर चव्हाण आणि गणपत सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


या दोन्ही सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांना तसेच ग्रामस्थांना आकर्षक आणि संस्मरणीय ठिकाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर हे सेल्फी पॉइंट गावाच्या पर्यटनाची आणि सौंदर्याची ओळख व्यापक करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

पर्यटनाला चालना, गावाच्या सौंदर्यात भर


कुंभारमाठ हे निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण वातावरण लाभलेले गाव आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणांचे नियोजनबद्ध सौंदर्यीकरण करून त्यांना आकर्षक स्वरूप देण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील असते. हा उपक्रम ही गावाच्या सौंदर्यात भर या दृष्टीने हाती घेतला आहे. या सेल्फी पॉइंटमुळे स्थानिक नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांना छायाचित्रे काढण्यासाठी एक सुंदर हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.


गावातील पर्यटनविषयक वैशिष्ट्ये अधिक प्रभावीपणे लोकांसमोर आणण्याबरोबरच गावाची स्वतंत्र आणि आकर्षक ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती


या लोकार्पण सोहळ्यास पंचायत समिती सदस्य मानसी भोगावकर, सरपंच पूनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य अनिता गावकर, प्रिया गोवेकर, दिव्या मिसाळ, आचल गावठे, प्रसाद नेरूरकर, प्रमोद भोगावकर, राहुल परब, सोनाली डिचोलकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, तसेच मधुकर चव्हाण, गणपत सावंत, विनय गांवकर, पांढरीनाथ माने, विनोद भोगावकर, मनोज वाटेगावकर, महेश पाटील, बचत गटांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या दोन्ही सेल्फी पॉइंटचे उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. गावाच्या विकासासोबतच पर्यटन, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दिशेने ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या उपक्रमांचे स्वागत करण्यात आले.

विकासासोबत पर्यटनवाढीवर भर


यावेळी बोलताना सरपंच सौ. पूनम वाटेगावकर यांनी सांगितले की, गावाचा सर्वांगीण विकास करताना केवळ मूलभूत सुविधांवरच नव्हे, तर पर्यटन, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनावरही भर देण्यात येत आहे. कुंभारमाठची विशेष ओळख निर्माण करण्यासाठी भविष्यातही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.

ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे कुंभारमाठच्या सार्वजनिक परिसराला आकर्षक रूप मिळाले असून, दोन्ही सेल्फी पॉइंट पर्यटक आणि ग्रामस्थांसाठी नव्या आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top