Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कवी रुजारीओ पिंटो यांचा 'माँ मेरी' हिंदी कवितासंग्रह..

कवी रुजारीओ पिंटो यांचा 'माँ मेरी' हिंदी कवितासंग्रह..

१५ ऑगस्टला मालवण येथे प्रकाशन

मालवण | प्रतिनिधी :
कोकणातील सुप्रसिद्ध कवी रुजारीओ पिंटो यांच्या 'माँ मेरी' या पहिल्यावहिल्या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वांतत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आला आहे. मालवण-कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात सायंकाळी ४.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

काव्यप्रेमी आणि साहित्यिकांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला कवी रुजारीओ पिंटो यांच्यासह आगोस्तीन डिसोझा उपस्थित होते.

या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी पिंटो यांचे भंडारी हायस्कूलमधील माजी हिंदी शिक्षक रवींद्र वराडकर यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रभाषा पंडित कृष्णा मालंडकर यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून ते सोहळ्याला विशेष उपस्थित असणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद व साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रत्नागिरीतील 'सत्वश्री प्रकाशन'चे (कोकण मीडिया कन्सल्टन्सी) प्रमोद कोनकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून, आकर्षक मुखपृष्ठ प्रवीण पवार यांनी साकारले आहे.

कवी रुजारीओ पिंटो

यावेळी बोलताना कवी रुजारीओ पिंटो म्हणाले, "मराठी, मालवणी आणि कोंकणी भाषेत मी आजवर लिहिलेल्या कविता व कथांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आपली मालवणी संस्कृती आणि लोकजीवन केवळ इथपर्यंतच मर्यादित न राहता राष्ट्रभाषेच्या माध्यमातून देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मी हा हिंदी कवितासंग्रह रचला आहे."

या कवितासंग्रहात ८६ निवडक व दर्जेदार कवितांचा समावेश आहे. 'माँ मेरी' हे नाव एका बाजूला आईची माया व्यक्त करते, तर दुसऱ्या बाजूला माझ्या आईचे नाव 'मेरी' असल्याने या शीर्षकाला विशेष भावनिक महत्त्व लाभले आहे.

मालवणवासीय, साहित्यप्रेमी आणि हिंदी भाषाप्रेमींनी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

फोटो - काव्यसंग्रह प्रकाशनाची माहिती देताना नितीन वाळके, कवी रुजारीओ पिंटो, आगोस्तिन डिसोजा आदी. (राहुल जाधव )

ruchira top