Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

टोपीवाला हायस्कूलची भव्य ‘वंदे मातरम्’ तिरंगा रॅली..

टोपीवाला हायस्कूलची भव्य ‘वंदे मातरम्’ तिरंगा रॅली..

साडेसहाशे विद्यार्थ्यांनी साकारला देशभक्तीचा सोहळा

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

शिस्तबद्ध नियोजनातून राष्ट्रप्रेमाचा जागर

‘वंदे मातरम्’च्या सार्धशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्या निमित्त आयोजन

मालवण | प्रतिनिधी : 
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात टोपीवाला हायस्कूल, मालवणच्या साडेसहाशे विद्यार्थ्यांनी मालवण शहरातून भव्य ‘वंदे मातरम्’ तिरंगा रॅली काढत देशभक्तीचा जागर केला. ‘वंदे मातरम्’ गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या सार्धशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले.


विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या तीन रंगांचे पोशाख परिधान करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचेही भान जपले. मार्गात कुठेही कचरा किंवा कागद न टाकता त्यांनी शिस्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले. त्यामुळे टोपीवाला हायस्कूलची शिस्त व विद्यार्थ्यांचे कौतुक विशेष ठरले.
भारताची राजमुद्रा तसेच तिरंग्याची आकर्षक प्रतिकृती चित्रकला शिक्षक बी. जी. सामंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली. ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून स्वातंत्र्यलढ्यातील पराक्रम, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. या गीताचा इतिहास आणि त्याचे महत्त्व डॉ. ज्योती तोरस्कर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या रॅलीची संकल्पना मुख्याध्यापक वळंजू सर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली, तर नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख महेश धामापूरकर यांनी केले. शिस्तबद्ध नियोजनातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीचा प्रेरणादायी संदेश दिला.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top