Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दांडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इंडोअर गेम भेट...

दांडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इंडोअर गेम भेट...

भाजपा महिला शहराध्यक्षा तथा नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांचा शैक्षणिक उपक्रम

मालवण | प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने भाजपा महिला शहराध्यक्षा तथा मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांच्या वतीने दांडी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इंडोअर गेम साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळ आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होता यावे, त्यांच्या कल्पकतेला व कौशल्यांना वाव मिळावा तसेच नियमित सरावातून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने अन्वेषा आचरेकर यांनी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविला. वह्या, शैक्षणिक साहित्य तसेच इंडोअर गेमचे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून प्रत्यक्ष शाळेत पोहोचत त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा अन्वेषा आचरेकर यांचा उपक्रम हा निश्चितच कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आचरेकर यांचे आभार व्यक्त केले.


यावेळी नगरसेविका महानंदा खानोलकर, भाजप महिला पदाधिकारी दीक्षा गावकर, अमृता फाटक, तारका चव्हाण, महिमा मयेकर, सचिन मालंडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, शिक्षिका श्रद्धा बागवे, अमृता राणे, उज्ज्वला चोकेकर, अंगणवाडी सेविका मोरजकर, मदतनीस गांवकर तसेच पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण यांनी अन्वेषा आचरेकर यांचे आभार मानले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top