Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा

‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मार्फत आयोजन – मनीष दळवी

प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजारांचे बक्षीस

जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यामधील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. सन २०१२ पासून गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) कोल्हापूर यांच्या मार्फत दूध संकलन सुरू झाले. सुरुवातीला ५०० लिटर दूध संकलन होत असताना ते आता २८,००० लिटर प्रतिदिन पर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील १२१ गावांमधील एकूण १४१ संस्था मार्फत दूध संकलन केले जाते, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा. मनीष दळवी यांनी दिली.

पुढील पाच वर्षांत जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन प्रतिदिन एक लाख लिटर करण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा

जिल्ह्यातील दूध सहकारी संस्थांमधील व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, डिजिटल व्यवहार, दूध संकलनात वाढ, सभासद सेवा आणि बँकेच्या व शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर यांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अध्यक्ष दळवी म्हणाले, "या स्पर्धेमुळे दूध सहकारी संस्थांमध्ये निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव होईल तसेच इतर संस्थांना आदर्श कामकाज करण्यास प्रेरणा मिळेल. यामुळे बँकेची दूध सहकारी संस्थांच्या सभासदांची बँकिंग सेवा वृद्धिंगत होण्यास मदत होईल."

बक्षिसांची रचना

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येईल.
प्रथम क्रमांक : रु. ५०,०००/-
द्वितीय क्रमांक : रु. ३०,०००/-
तृतीय क्रमांक : रु. २०,०००/-

ही तीन बक्षिसे सलग तीन वर्षे देण्यात येणार असून, बक्षिसे संस्थेच्या गरजेनुसार वस्तुरूप / साहित्य स्वरूपात देण्यात येतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संस्थेने विहित नमुन्यातील माहिती २० ऑगस्ट, २०२६ पर्यंत बँकेकडे देण्याचे आवाहन अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

ruchira top