Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

स.का.पाटील मध्ये गार्लंड ऑफ वर्ड्स काव्यसंग्रहाचे प्रकाशन

स.का.पाटील मध्ये गार्लंड ऑफ वर्ड्स काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मालवण : स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या लिटरेचर असोसिएशन मार्फत डॉ. शिल्पा झांटे लिखित गार्लंड ऑफ वर्ड्स या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व त्यावरील परिसंवाद संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृ. सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री साईनाथ चव्हाण साहेब, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा के के राबते, काव्यसंग्रहाच्या लेखिका डॉक्टर शिल्पा झांट्ये,काव्यसंग्रहाचे अनुवादक व सीडीसी सदस्य मा श्री गुरुनाथ राणे, एडवोकेट श्रीमती आश्लेषा मोरवेकर, प्रा डॉ.हंबीरराव चौगुले, प्रो.डॉ उज्वला सामंत आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉक्टर शिल्पा झांट्ये लिखित गार्लंड ऑफ वर्ड्स या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व त्यावरील परिसंवाद स का पाटील महाविद्यालया तील झांट्ये सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन लिटरेचर असोसिएशन मार्फत करण्यात आले होते.याप्रसंगी काव्यसंग्रहा वरील काव्य मिमांसा प्रो डॉ. उज्वला सामंत तसेच प्रा के के राबते त्याचबरोबर एडवोकेट आश्लेषा मोरवेकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अनुवादक मा. श्री गुरुनाथ राणे यांनी काव्यसंग्रहाचे महत्त्व, त्याचबरोबर अनुवाद करताना आलेले अनुभव कथन केले या कविता अनुभव सांगणाऱ्या हिंसाचाराच्या विरोध करणाऱ्या आहेत असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर या कविता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देतात असे सांगितले.

प्रभारी प्राचार्य के के राबते यांनी कविते बाबत आपले विचार व्यक्त करताना ही कविता प्रेम करुणा संघर्ष सकारात्मक विचार देते त्याचबरोबर या कवितेमध्ये संवेदनशीलता आहे जीवनाकडे कसं बघावं? व कसं जगावं? हे ही कविता शिकवते? असे त्यांनी नमूद केले. हा काव्यसंग्रह म्हणजे एक शब्दमय उत्सव आहे अशा प्रकारचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रो डॉ. उज्वला सामंत यांनी काव्यसंग्रहाबाबत आपले मत व्यक्त करताना काही कवितांचा उल्लेख केला. या कविता रोजच्या जीवनातील विविध अनुभव कथन करणाऱ्या आहेत. त्याचबरोबर महिलांना जागृत करणाऱ्या या कविता आहेत असे त्यांनी मत व्यक्त केले. महिलांनी सशक्त कसं व्हायला पाहिजे हेही या कविता सांगतात असे त्यांनी सांगितले. एडवोकेट आश्लेषा मोरवेकर यांनी काव्यसंग्रह विषयी बोलताना नेल्सन मंडेला, अलेक्झांडर द ग्रेट या महापुरुषांची उदाहरणे देत शब्दांमध्ये किती ताकद असते हे समजावून सांगितले. रामायण महाभारत यांच्या उल्लेख करत ही महाकाव्य कशी प्रेरणा देतात याबद्दल मार्गदर्शन केले. कवितेमध्ये ताकत असते शब्दांमध्ये ताकद असते याचाही पुनरुचार केला. कवयित्री डॉ. झांटे मॅडम यांनी स्वतःच्या कवितेंब बद्दल माहिती देत असताना आपल्या बोलण्यातून आपली संवेदनशीलता दिसून येते. ही कविता प्रसिद्धी किंवा धनप्राप्तीसाठी नसून ती समाजाच्या भल्यासाठी लिहिली गेली आहे असे मत व्यक्त केले. काही कवितांचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेचे महत्त्व पटवून दिले.कम्पॅरिजन, इट द एलिफंट या कवितेचा उहापोह घेतला तसेच विद्यार्थ्यांनी चांगलं कर्म करावं चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात तसेच आपले छंद जोपासावेत याबद्दल ही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री साईनाथ चव्हाण सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये आपण जो विचार करतो त्याप्रमाणे आपण प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करावं आणि त्याचा जरूर पाठलाग करावा याबद्दल मार्गदर्शन केले कसं जगावं हे या कविता शिकवितात सर्वोत्तम कसं व्हावं याबद्दलही या कवितेमध्ये मार्गदर्शन केलेला आहे असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी अष्टपैलू बनण्यासाठी प्रयत्न करावा अशी अशी अपेक्षा आहे त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे आभार इंग्रजी विभाग प्रमुख प्रा एस पी खोबरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ.हंबीरराव चौगुले यांनी केले.

ruchira top