Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता!

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता!

प्लास्टिक राष्ट्रध्वजांचे उत्पादन, साठवण, वितरण व विक्रीवर कारवाई व्हावी

हिंदू जनजागृती समितीचे प्रशासनाला व शैक्षणिक संस्थांना निवेदन


मालवण | प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने देशभरात अभिमानाने तिरंगा फडकवला जातो. मात्र, राष्ट्रीय सणांचा कार्यक्रम संपल्यानंतर अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज रस्त्यावर, कचऱ्यात तसेच नाल्यांमध्ये पडलेल्या किंवा फाटलेल्या अवस्थेत आढळून येतात. विशेषतः प्लास्टिकपासून बनविलेले राष्ट्रध्वज सहज विघटित होत नसल्याने दीर्घकाळ तसेच पडून राहतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता निर्माण होते.

राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि त्याची विटंबना रोखण्यासाठी तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर पूर्णपणे थांबविण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण तहसीलदार गणेश लव्हे, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले.

हिंदू जनजागृती समितीने निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांमुळे होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाला देण्यात आले होते. सध्या देशभरात ‘सिंगल यूज प्लास्टिक’च्या वापरावर विविध नियमांद्वारे निर्बंध आहेत. त्यामुळे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच ‘भारतीय ध्वजसंहिता, २००२’ नुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे समितीने नमूद केले.


‘राष्ट्रध्वज संरक्षण कृती समिती’ स्थापन करण्याची मागणी

जिल्हास्तरावर तातडीने ‘राष्ट्रध्वज संरक्षण कृती समिती’ स्थापन करून त्यामध्ये स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्लास्टिकबंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करताना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन, साठवणूक, वितरण अथवा विक्री करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांच्या माध्यमातून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा!’ ही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानंतर सार्वजनिक ठिकाणी आढळणारे राष्ट्रध्वज तातडीने सन्मानपूर्वक गोळा करून भारतीय ध्वजसंहितेतील तरतुदींनुसार त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशीही मागणी समितीने केली.

दोन दशकांहून अधिक काळ जनजागृती

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा!’ या उपक्रमांतर्गत व्याख्याने, प्रश्नमंजुषा, फलक तसेच विविध जनजागृती अभियानांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. यापुढेही राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
यावेळी ॲड. हेमेंद्र गोवेकर, दशरथ कवटकर, राजन सकपाळ, दीनानाथ गावडे, श्रीराम परब, अनिकेत फाटक, प्रणित मांजरेकर, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top