Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

चिवला बीच येथील स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित

चिवला बीच येथील स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित

मालवण नगरपरिषद, लायन्स क्लब ऑफ मालवण व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ; ‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण’चा संदेश

मालवण | प्रतिनिधी : ‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण’ या संकल्पनेतुन मालवण चिवला बीच येथे मंगळवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मालवण नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित या मोहिमेत सुमारे ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला.

नगरपरिषद आरोग्य सभापती तथा लायन्स क्लब सचिव पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी लायन्स क्लबचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या उपक्रमात लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, सदस्य रुजारिओ पिंटो, उमेश शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शांती पटेल, रूपा कांदळकर, विजेता मेथर, बागवे काका यांच्यासह नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

समुद्रकिनारा स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याबाबत यावेळी जनजागृती ही करण्यात आली.या मोहिमेदरम्यान चिवला बीच परिसरात प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचे टाकाऊ साहित्य गोळा करण्यात आले. संकलित केलेला कचरा वर्गीकरण करून योग्य विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला.

समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून देण्यात आला. चिवला बीच स्वच्छ करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांकडून कौतुक करण्यात आले.


▪️ अमित खोत, मालवण

ruchira top