मालवण | प्रतिनिधी : असगणी गावचे माजी सरपंच अरुण पांडुरंग परब यांची भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
भाजपा मालवण कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, महेंद्र चव्हाण, समृद्धी असोलकर, सुमित सावंत, प्रविण घाडीगांवकर, दया हाटले, अरुण मेस्त्री, दिपक सुर्वे, पंकज सादये यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

भाजपा किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष पदी अरुण परब यांची निवड..
