Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख महेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन....

शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख महेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन....


डॅशिंग व कर्तृत्ववान नेतृत्वाची दमदार वाटचाल!

यशस्वी उद्योजक ते शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख असा यशस्वी प्रवास घडलेले मालवण तालुक्यातील असरोंडी गावचे सुपुत्र श्री. महेश राणे यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि दमदार नेतृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सामाजिक बांधिलकी जपत सदैव मदतीसाठी तत्पर राहत त्यांनी अनेकांना आधार, रोजगार दिला. पक्ष संघटनेत ही मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत स्थानिक पातळीवर पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. यशस्वी, डॅशिंग आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार ते व्यक्त करतात. अशा या कर्तृत्ववान, धडाडीच्या आणि समाजाभिमुख नेतृत्वाचा आज वाढदिवस.


मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्न असरोंडी गावचे सुपुत्र श्री. महेश राणे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उद्योग-व्यवसाय, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यशस्वी उद्योजक ते शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख हा त्यांचा प्रवास केवळ पदांचा प्रवास नाही, तर संघर्ष, जिद्द, मेहनत, नेतृत्वगुण आणि माणुसकीच्या मूल्यांवर उभ्या राहिलेल्या कर्तृत्वाची कहाणी आहे.

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करणारे, आपल्या सोबतच्या माणसांनाही पुढे घेऊन जाणारे आणि अडचणीच्या काळात मदतीसाठी तत्पर राहणारे नेतृत्व म्हणून महेश राणे यांनी जनमानसात आपली छाप निर्माण केली आहे. डॅशिंग व्यक्तिमत्त्व, निर्णयक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात.

असरोंडी गावच्या मातीत घडलेल्या महेश राणे यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण असरोंडी तसेच कणकवली येथे झाले. विद्यार्थी जीवनापासूनच नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून आली. परिस्थिती कोणतीही असो, त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याची वृत्ती त्यांनी जपली.

शिक्षणानंतर उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वाट निर्माण केली. एग्रीकल्चर लँड डेव्हलपमेंट, चिरेखाण व्यवसाय आणि त्यानंतर हॉटेल व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत त्यांनी यशस्वीपणे पाऊल टाकले. मेहनत, नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या जोरावर त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील उल्लेखनीय टप्पा म्हणजे ‘हॉटेल राणेशाही’ या व्यवसायाची उभारणी.
व्यवसाय करताना केवळ स्वतःचीच प्रगती न साधता स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. आई, वडील, पत्नी,भाऊ, मित्रपरिवार, पक्ष नेतृत्व तसेच कल्याण डोंबिवली माजी महापौर शाहू सावंत यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे महेश राणे सांगतात.

उद्योजक म्हणून यश मिळवत असताना महेश राणे यांनी सामाजिक बांधिलकी कधीही बाजूला ठेवली नाही. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देत त्यांनी ‘आपण पुढे जाताना आपल्या सोबतची माणसेही पुढे गेली पाहिजेत’ हा विचार कृतीतून जपला. गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे, अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे आणि मित्रपरिवार व परिचितांशी आपुलकीचे संबंध जपणे, हा त्यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकीय पदापुरते मर्यादित न राहता सामाजिक जिव्हाळा असलेले नेतृत्व म्हणून पुढे आले आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदापर्यंत प्रवास...


महेश राणे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा सचिव म्हणून झाली. त्यानंतर राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांचा प्रवास अधिक गतिमान झाला. पुढे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी संघटनेची जबाबदारी स्वीकारली आणि या जबाबदारीला न्याय देताना आपल्या संघटन कौशल्याची प्रभावी झलक दाखवून दिली.
तालुकाप्रमुख म्हणून काम करताना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे, गावागावातील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि निवडणुकीच्या काळात प्रभावी नियोजन करणे, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणे. यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

विविध निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना यश मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले नियोजन आणि संघटनात्मक मेहनत याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांच्यावर शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख अशी अधिक मोठी जबाबदारी सोपविण्यात आली.


उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महेश राणे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तळागाळातील शिवसैनिकांशी संपर्क ठेवण्यावर त्यांनी भर दिला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ निवडणुकीपुरते कार्य न करता सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि संघटनात्मक कामात त्यांना प्रोत्साहन देणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.

आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

माणसांना जोडणारे नेतृत्व...

महेश राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद त्यांच्या संपर्कातील माणसांमध्ये दिसून येते. प्रत्येकाशी असलेले संबंध जपले पाहिजेत, या भावनेतून ते मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांशी नाते जपतात. कार्यकर्त्यांपासून मित्रांपर्यंत आणि सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांपासून व्यावसायिक सहकाऱ्यांपर्यंत अनेकांशी त्यांनी आपुलकीचे संबंध निर्माण केले आहेत. माणसे जोडणे, विश्वास निर्माण करणे आणि गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी जमेची बाजू आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास


उद्योग-व्यवसायात यशस्वी उद्योजक, सामाजिक क्षेत्रात मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व आणि राजकीय क्षेत्रात संघटन कौशल्य सिद्ध करणारे नेतृत्व, अशी महेश राणे यांच्या वाटचालीची त्रिसूत्री आहे. अडचणींना घाबरून न जाता त्यातून संधी शोधणे, मिळालेल्या प्रत्येक संधीचे कर्तृत्वात रूपांतर करणे आणि आपल्या यशाचा आलेख उंच करणे. फायदा सहकाऱ्यांनाही करून देणे, या वृत्तीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे.
असरोंडीच्या मातीतून सुरू झालेला प्रवास आज सिंधुदुर्गाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास निश्चितच अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कर्तृत्वाची ही घोडदौड अशीच सुरू राहो!

उद्योग-व्यवसायात अधिकाधिक भरारी घेताना स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, सामाजिक कार्याची व्याप्ती वाढावी, पक्ष संघटना अधिक मजबूत व्हावी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांचा आवाज अधिक बुलंद व्हावा.

डॅशिंग नेतृत्व, धडाडीची कार्यशैली, संघटन कौशल्य आणि माणुसकीची नाळ जपणारे शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख श्री. महेश राणे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नवे वर्ष यश, समाधान, उत्तम आरोग्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि नव्या कर्तृत्वाने बहरत राहो. उद्योग, समाजकारण आणि राजकारणातील त्यांची ही यशस्वी वाटचाल भविष्यात आणखी व्यापक होवो आणि त्यांच्या नेतृत्वातून असंख्य सहकारी व सर्वसामान्यांना नवी ऊर्जा मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

▪️शब्दांकन : अमित खोत, मालवण

ruchira top