अध्यक्षपदी रविकांत कदम, तर सरचिटणीसपदी नचिकेत पवार
मालवण | प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणची सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रविकांत कदम, तर सरचिटणीसपदी नचिकेत पवार यांची निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्षपदी प्रकाश पवार आणि कार्यालयीन सचिवपदी शंकर कदम यांची निवड झाली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू तसेच शंकर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – रविकांत कदम
सरचिटणीस – नचिकेत पवार
कोषाध्यक्ष – प्रकाश पवार
कार्यालयीन सचिव – शंकर कदम
हिशोब तपासणीस – वैभव कदम
उपाध्यक्ष (संस्कार विभाग) – सूर्यकांत कदम
उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन विभाग) – संग्राम कासले
उपाध्यक्ष (संरक्षण विभाग) – योगेश वराडकर
सचिव (संस्कार विभाग) – सचिन कासले, मिलिंद पवार
सचिव (प्रचार व पर्यटन विभाग) – संदीप कदम, संकेत पेंडूरकर
सचिव (संरक्षण विभाग) – गणेश कासले, अमोल तळगावकर
संघटक – राजेंद्र जाधव, विशाल डिकवलकर, भरत पेंडूरकर, गौरव जंगम, भिवा तळगावकर.
दरम्यान, मावळते अध्यक्ष, सरचिटणीस आणि संपूर्ण कार्यकारिणीने मागील दोन वर्षांच्या कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कार्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, आर. डी. चेंदवणकर, विलास वळंजू आणि शंकर कदम यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार आणि कोषाध्यक्ष प्रकाश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा नेतृत्वाच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
▪️अमित खोत, मालवण

