Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त लायन्स क्लब मालवणचा शैक्षणिक उपक्रम..

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त लायन्स क्लब मालवणचा शैक्षणिक उपक्रम..

फाटक शाळा रेवताळे मालवण येथे शालेय वक्तृत्व स्पर्धा ; प्रशालेतील २९ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण प्रथम

मालवण | प्रतिनिधी : 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने लायन्स क्लब मालवणच्या वतीने शैक्षणिक उपक्रम अंतर्गत फाटक शाळा, रेवतळे (मालवण) येथे शालेय वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भाविका धीरज सोनगत द्वितीय तसेच हार्दिक महेश दाभोलकर यांनी तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ पारितोषिक समृद्धी कैलास माने, संचित कमलाकांत मसुरकर यांनी प्राप्त केले.


स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, जेष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी व अन्य लायन्स सदस्य तसेच शिक्षक देविदास नामदेव प्रभुगांवकर, महादेव श्रीहरी घोडके तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

स्पर्धेतील सर्व पारितोषिक ज्येष्ठ लायन्स सदस्या जयश्री हडकर यांनी पुरस्कृत केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानून कौतुक केले.


विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वाची आवड, राष्ट्रपुरुषांच्या विचारांप्रती आदर आणि आत्मविश्वास जागविणारा हा उपक्रम लायन्स क्लब मालवणच्या सामाजिक, शैक्षणिक बांधिलकीचा आणखी एक आदर्श ठरला. उपस्थितांकडून क्लबच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

▪️ अमित खोत मालवण

ruchira top