Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन...

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन...

नवीन क्रीडा पोर्टलच्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याची आणि जुने पोर्टल सुरू ठेवण्याची मागणी

सिंधुदुर्ग : राज्य क्रीडा विभागामार्फत शालेय क्रीडा स्पर्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन ऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले आहे. नवीन पोर्टल पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत जुने पोर्टल सुरू ठेवण्यात यावे आणि शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाप्रमुख मुद्दे :

जुने पोर्टल सुरू ठेवण्याची मागणी: नवीन पोर्टलवर खेळाडूंची नोंदणी, माहिती भरणे व अद्ययावत करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी, नवीन प्रणाली पूर्णपणे त्रुटीमुक्त होईपर्यंत जुने पोर्टलही कार्यरत ठेवावे.

तांत्रिक त्रुटी दूर करणे: नवीन क्रीडा पोर्टलवर सध्या येत असलेल्या विविध तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात.

प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन: जिल्ह्यातील सर्व शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी तालुका व जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष (ऑफलाइन/हँड्स-ऑन) प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करावे.

हेल्पडेस्क किंवा समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती: पोर्टलसंदर्भातील समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पडेस्क किंवा समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी.

मुदतवाढ व पर्यायी व्यवस्था: तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी नोंदणीस योग्य ती मुदतवाढ देऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, पोर्टलवरील अडचणींमुळे वेळेत नोंदणी न झाल्यास विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातील भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती महासंघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय मधुकर शिंदे, कार्याध्यक्ष विजय तातोबा मागाडे आणि सचिव नंदकिशोर गजानन नाईक यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले आहे.

ruchira top