Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गणेशोत्सवा पुर्वतयारी दृष्टीने मालवण नगरपरिषद सज्ज!

गणेशोत्सवा पुर्वतयारी दृष्टीने मालवण नगरपरिषद सज्ज!

रस्ते दुरुस्ती, विसर्जन स्थळांचे सुशोभीकरण, पार्किंग झोन व स्ट्रीट लाईट दुरुस्तीची कामे वेगात

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती; नागरिकांच्या सोयीसाठी नगरपालिकेची व्यापक तयारी

मालवण | प्रतिनिधी :- 
गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरातील विविध विकास व सुविधा कामांना गती दिली असून रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती, पार्किंग झोनची निर्मिती, स्ट्रीट लाईट दुरुस्ती, झाडी छाटणी आणि डास प्रतिबंधक फवारणी अशा विविध कामांना प्रारंभ झाला आहे. ही सर्व कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली.


नगराध्यक्षा सौ. वराडकर म्हणाल्या की, गणेशोत्सवाच्या काळात शहरात येणाऱ्या भाविक व नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने २८ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून ३१ जुलै रोजी संबंधित कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.

या अंतर्गत शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. तसेच मालवण कचेरी–फोवकांडा पिंपळ–भरडनाका ते देऊळवाडा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही सूचना देण्यात आल्या असून बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर या कामासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.


गणेशोत्सवात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी छाटण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात वाढणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी डास प्रतिबंधक फवारणी मोहीमही सुरू असून हे काम आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

गणेश विसर्जन स्थळांवर आवश्यक दुरुस्ती, जलस्रोतांतील गाळ काढणे, वाळूचे रॅम्प तयार करणे तसेच पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील वाढती वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पार्किंग झोन तयार करणे, बॅरीकेट्स व दिशादर्शक फलक उभारणे, वाहनतळांचे सीमांकन व पट्टे मारणे ही कामेही केली जाणार आहेत. शहरातील स्ट्रीट लाईटची दुरुस्तीही प्राधान्याने केली जाणार आहे.

या सर्व कामांमध्ये उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव तसेच नगरसेवक तसेच नगरसेविका शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, नगरसेवक महेश कोयंडे, महेश कांदळगावकर, ललित चव्हाण, रविकिरण तोरसकर, मंदार केणी आणि नगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभत असल्याचे नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी सांगितले. नागरिकांच्या सहकार्याने गणेशोत्सव निर्विघ्न व आनंदात पार पडावा, यासाठी सर्व कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमित खोत, मालवण

ruchira top