शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती ; किर्लोस येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा किर्लोस येथील 'विजयालक्ष्मी' गजु बाक्रे मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि शुभेच्छांच्या वर्षावात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत म्हणाले, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करतं असताना संघटना मजबुती व जनसेवा यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्याला शिवसेना उपनेते संजय आग्रे तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते व उपस्थितीत विनायक बाईत यांचा वाढदिवसाचा केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करताना विनायक बाईत यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोपीलाड यांनी प्रास्ताविकातून विनायक बाईत यांच्या कार्याचा गौरव केला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या. अभिष्टचिंतन सोहळ्यास
यावेळी तालुकाप्रमुख मंदार लुडबे, माजी सभापती सुनिल घाडीगांवकर, विभाग प्रमुख प्रशांत परब, निलेश बाईत, उमेश घाडीगांवकर, मकरंद राणे, मठबुद्रुकचे सरपंच बाळा वेंगुर्लेकर, बाळा राऊत, युवासेना तालुकाप्रमुख अभी लाड, मनोज हडकर, सागर घाडीगांवकर, मंगेश यादव, बंडू गावडे, अतुल तांबे, कृष्णा बाईत यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि असंख्य सहकारी मित्रपरिवार यांची उपस्थिती लाभली.
उत्साहपूर्ण वातावरण आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद यामुळे हा अभिष्टचिंतन सोहळा संस्मरणीय ठरला. विनायक बाईत यांच्या नेतृत्वावरील विश्वास आणि त्यांच्याप्रती असलेला सहकारी यांचा स्नेह या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
अमित खोत, मालवण

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!
