Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

'महिला सन्मानाचा’ आदर्शवत उपक्रम..

'महिला सन्मानाचा’ आदर्शवत उपक्रम..

रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना मिळाला आनंदाचा विरंगुळा

राजकोट महिला मंडळाच्या भगिनींची नापणे धबधब्यावर अविस्मरणीय सफर

बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांनी वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम


मालवण | प्रतिनिधी :
मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब मालवण अध्यक्ष, उद्योजक सहदेव बापर्डेकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील अनेक सदस्यांच्या सोबत साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, नेत्रतपासणी यांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत असताना महिला सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली पर्यटन सफर आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरली.


राजकोट महिला मंडळातील ४५ ते ६० वयोगटातील महिला भगिनींसाठी नापणे धबधबा व येथील महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलावर विशेष पर्यटन सफरीचे आयोजन करण्यात आले. संसार, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ देणे अनेक महिलांना शक्य होत नाही. या महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी यावी, त्यांना मनमोकळे क्षण अनुभवता यावेत आणि काही काळासाठी का होईना रोजच्या व्यापातून विरंगुळा मिळावा, या भावनेतून या सफरीचे आयोजन करण्यात आले.

धबधब्याच्या सान्निध्यात फुलला आनंदाचा क्षण

वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणात महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. वृंदावन रिसॉर्ट येथे गप्पा, हास्यविनोद, खेळ आणि धमाल करत महिलांनी आपल्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण अनुभवले. अशा प्रकारे एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.
ही केवळ पर्यटन सफर नव्हती, तर ‘आपल्यासाठीही कुणीतरी भावा प्रमाणे, कुटुंबातील सदस्या प्रमाणे विचार करते’ या भावनेची सुखद अनुभूती देणारा आपुलकीचा क्षण होता. महिला भगिनींच्या आनंदाला प्राधान्य देत त्यांच्या भावविश्वाची जपणूक करणारा हा उपक्रम प्रेरणादायी अनुभूती देणारा ठरला.


‘सन्मान’ म्हणजे केवळ सत्कार नव्हे, तर जपले जाणारे आनंदाचे क्षण

महिलांचा सन्मान म्हणजे केवळ व्यासपीठावर सत्कार करणे किंवा पुष्पगुच्छ देणे एवढाच मर्यादित अर्थ नसून, त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांना आनंदाचे आणि निवांतपणाचे क्षण देणे हा खरा सन्मान आहे, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘आनंद वाटला की तो अधिक वाढतो’ हा संदेशही अधोरेखित झाला. त्यामुळे ही सफर महिलांसाठी आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवावी अशी ठरली.

मैत्री, आनंद आणि आपुलकीने रंगली सफर

या पर्यटन सफरीत मंदा जोशी, गौरी खांदारे, गौरी दुधवडकर, शुभांगी जोशी, गीता बापर्डेकर, स्मिता नार्वेकर, राजश्री रामाडे, प्राची चिंदरकर, गायत्री गावकर, अमोल रेडकर, नेहा देसाई, निलीमा भाबल, साधना मोर्वेकर, सुषमा केळुसकर, भावना कवटकर, उत्कर्षा मंडलीक, श्रावणी कामत, सुचीता खांदारे, गीता खांदारे, फ्लोरी फर्नांडीस, शांती साटम, इरीना फर्नांडीस, मनीषा दुधवडकर, सुरेखा चिंदरकर, मीना जोशी, शुभांगी मुणगेकर, अर्पीता मुणगेकर, मंगल गोवेकर, इसप्रांस फर्नांडीस, सरीता कुडाळकर, इरमीत फर्नांडीस, मिलाग्रीन फर्नांडीस, जेनीफर फर्नांडीस, फुला नरोना यांच्यासह महिला भगिनी सहभागी झाल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा प्रयत्न समाजासाठी संदेश देणारा ठरला. त्यामुळे सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसाचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता महिलांच्या सन्मानाला, आनंदाला आणि आपुलकीच्या नात्याला जपणारा एक वेगळा सामाजिक आदर्श म्हणून लक्षवेधी ठरला.

▪️राणे साहेबांची शिकवण : सहदेव बापर्डेकर

या निमित्ताने सहदेव बापर्डेकर म्हणाले, आम्हाला राणे साहेबांची शिकवण आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपण समाजाचे देणे लगतो. ही भावना कायम असली पाहिजे. जनतेसाठी आपले सेवाकार्य असले पाहीजे. याच सामाजिक जाणीवेतून काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मालवण शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध असल्याचे सहदेव बापर्डेकर यांनी या निमित्ताने सांगितले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom