Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सामान्य कार्यकर्ता ते शिवसेना मालवण तालुकाप्रमुख यशस्वी वाटचाल..

सामान्य कार्यकर्ता ते शिवसेना मालवण तालुकाप्रमुख यशस्वी वाटचाल..

कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व...!

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत वाढदिवस अभिष्टचिंतन...

..................................

यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची कर्तृत्ववान ओळख निर्माण करतानाच जनसेवा, सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि विकासाभीमुख दृष्टिकोन या गुणांच्यासोबत सर्वाना सोबत पुढे घेऊन जाणारे आश्वासक नेतृत्व म्हणून शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी अल्पावधित आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. सामान्य कार्यकर्ता ते शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हा विनायक बाईत यांचा प्रवास सहज-सोपा नव्हता. संघर्ष, जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर त्यांनी व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली काम करतं असताना पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली आहे.


मालवण तालुक्यातील मठबुद्रुक गावचे सुपुत्र विनायक बाईत यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटविली. पद हे अधिकार उपभोगण्याचे नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी मिळालेले माध्यम आहे, या भावनेतून त्यांनी काम केले. त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा आणि नागरिकांशी निर्माण झालेल्या आपुलकीच्या नात्याचा ठसा कायम आहे.


संघटन कौशल्य ही ताकद; कार्यकर्त्यांचा विश्वास हीच खरी कमाई

विनायक बाईत यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी ताकद म्हणजे कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची कार्यपद्धती. संघटनात्मक जबाबदारी स्वीकारल्यानंतर मालवण तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविणे, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणे आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, यामुळे त्यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस व्यापक होत आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारे नेतृत्व

राजकारण म्हणजे केवळ निवडणुका आणि राजकीय पदे नव्हेत; संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे म्हणजे खरी जनसेवा, ही भूमिका विनायक बाईत यांनी आपल्या कार्यातून जपली आहे.
रस्ते, पाणी, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा यांसह नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांवर त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असतो. संवाद साधणे, अडचण समजून घेणे आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वाची जमेची बाजू आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जनतेचे प्रेम हीच त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाची खरी कमाई ठरली आहे.

विकासाची दृष्टी अन् सेवाभावाची नाळ कायम

विकासकामांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांमध्येही विनायक बाईत यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जबाबदाऱ्या वाढल्या, पदे बदलली; मात्र जनसेवेची तळमळ कधीही कमी झाली नाही, हीच त्यांच्या कार्याची विशेष ओळख म्हणावी लागेल. समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि शक्य तेथे मदतीचा हात पुढे करणे, या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.


निष्ठा, संघर्ष आणि सातत्यातून घडलेले प्रेरणादायी नेतृत्व

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे नेतृत्व समाजासाठी नेहमीच महत्त्वाचे असते. विनायक बाईत यांनी आपल्या कार्यातून ही भूमिका प्रभावीपणे अधोरेखित केली आहे.
निष्ठा, सातत्य, संघर्ष, संघटनशक्ती आणि जनसेवा या मूल्यांच्या आधारावर उभे राहिलेले त्यांचे नेतृत्व अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीकडे पाहता, आगामी काळातही जनसेवा आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात त्यांच्याकडून अधिक व्यापक योगदान निश्चितच दिले जाईल.

जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडून, कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करून आणि आपल्या कर्तृत्वातून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विनायक बाईत यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांची सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय वाटचाल अधिक यशस्वी, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

▪️ अमित खोत | मालवण

ruchira top