मोफत BMD (Bone Mineral Density) तपासणी शिबीर
लिमये हॉस्पिटल मालवण आणि रोटरी क्लब मालवण यांचे आयोजन
४ ऑगस्ट रोजी लिमये हॉस्पिटल मालवण येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : वाढते वय, बदलती जीवनशैली आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढतो. हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी योग्य वेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने लिमये हॉस्पिटल, मालवण आणि रोटरी क्लब, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत BMD (Bone Mineral Density) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लिमये हॉस्पिटल, भरड, मालवण येथे होणार आहे.
या शिबिरात ४० वर्षांवरील सर्व महिला तसेच ६० वर्षांवरील सर्व पुरुषांनी आवर्जून BMD तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
BMD तपासणीद्वारे हाडांची घनता मोजता येते आणि ऑस्टिओपोरोसिसचा संभाव्य धोका वेळेत लक्षात येण्यास मदत होते. ही तपासणी साधारणपणे अवघ्या दोन मिनिटांत, वेदनारहित आणि सुरक्षित पद्धतीने केली जाते.
“आजची काळजी म्हणजे उद्याचे स्वावलंबी आणि निरोगी जीवन!” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवारापर्यंत या मोफत तपासणीची माहिती पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मजबूत हाडे निरोगी आयुष्य....
