‘श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी’ तर्फे भरड मालवण येथे 3 ऑगस्ट रोजी आयोजन
नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा
पहिल्या ५० नोंदणी केलेल्या रुग्णांसाठी BSL (F & PP) तपासणी ही मोफत
मालवण : आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे ही काळाची गरज बनली आहे. मधुमेहाचे वेळीच निदान व्हावे आणि नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने ‘श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी’, भरड, मालवण यांच्या वतीने मोफत शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात BSL (F & PP) तपासणी मोफत करण्यात येणार असून, नोंदणी केलेल्या पहिल्या ५० रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
मधुमेहाचे लवकर निदान झाल्यास योग्य वेळी उपचार सुरू करता येतात. तसेच मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या विविध गुंतागुंती टाळण्यासाठी नियमित तपासणी महत्त्वाची ठरते. त्यामुळे नागरिकांनी या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक : ३ ऑगस्ट २०२६, सोमवार, वेळ : सकाळी ७.३० ते १०.००
स्थळ : श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी, भरड, मालवण
तपासणी : BSL (F & PP) — मोफत पहिल्या ५० नोंदणी केलेल्या रुग्णांसाठी विशेष सुविधा
अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 8411863206 / 9372223418

मोफत शुगर तपासणी शिबिर...
