Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ आणि प्रथम पुष्प संपन्न

वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ आणि प्रथम पुष्प संपन्न


मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2026 चा उद्घाटन समारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे आज संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप व धूप प्रज्वलन करून करण्यात आली. तदनंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. मालवण तालुक्याचे अध्यक्ष रविकांत कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील प्रथम पुष्प विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध या विषयाच्या अनुषंगाने तालुका उपाध्यक्ष माजी श्रामणेर, बौद्धाचार्य नचिकेत पवार यांनी गुंफले. तथागत भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्ग हा संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरणार आहे तर त्यांनी सांगितलेला प्रतित्यसमुद्पाद सिद्धांत आणि अनित्य सिद्धांताची प्रचिती जगात सर्वत्र अनुभवास येते. असे सांगून प्रज्ञा,समता,करुणा,शील या नीती मूल्यांना जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे अशी भगवान बुद्धांची शिकवण आहे आणि म्हणून भगवान बुद्ध हे संपूर्ण जगताचे गुरु आहेत अशी आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीने मांडणी केली. या कार्यक्रमाला संस्कार सचिव मिलिंद पवार आणि तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी शुभेच्छा दिल्या तर तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी अध्यक्षीय मनोगत केले.
यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, संरक्षण कमांडर अरुण जाधव, जिल्हा महिला शाखा संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडूरकर, जिल्हा महिला शाखा संघटक लीना तळगावकर, तालुका महिला शाखा सरचिटणीस समता डिकवलकर, संस्कार सचिव मिलिंद पवार, तालुका संघटक भरत पेंडूरकर, तालुका प्रचार पर्यटन सचिव सचिन कासले, बार्टीचे समतादूत संग्राम कासले, तालुका महिला शाखा संघटक सानिका कदम, कुणकवळे गाव शाखा अध्यक्ष संदीप कदम, मसदे गाव शाखा अध्यक्ष तानाजी कदम, वडाचा पाट गाव शाखा अध्यक्ष गणेश कासले, वराड गाव शाखा अध्यक्ष राजेंद्र वराडकर, गोळवण गाव शाखा अध्यक्ष शशिकांत पवार, तळगाव गाव शाखा अध्यक्ष संदीप तळगावकर, चौके गाव शाखा अध्यक्ष रामचंद्र कदम,डिकवल गाव शाखेचे सचिव सदानंद डिकवलकर, वराड गाव शाखा कोषाध्यक्ष अरविंद वराडकर, चौके गाव शाखा कोषाध्यक्ष शुभम चौकेकर, वैभव पवार, कुणकवळे गाव शाखा महिला अध्यक्ष निशाताई कदम, संघमित्रा कदम, कुमार सुयश कदम आदी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संस्कार विभाग सचिव योगेश वराडकर यांनी केले.

ruchira top