Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

देऊळवाडा सागरी महामार्गावर भरणारा आठवडा बाजार बंद करू नये..

देऊळवाडा सागरी महामार्गावर भरणारा आठवडा बाजार बंद करू नये..

मालवण देऊळवाडा श्री देव नारायण मंदिर येथे बैठक : नागरिकांनी मांडली आग्रही आणि ठाम भूमिका

मालवण | प्रतिनिधी :
मालवण देऊळवाडा येथे सागरी महामार्गावर भरणारा आठवडा बाजार बंद करू नये. हा बाजार देऊळवाडा तसेच मालवणच्या आजूबाजूच्या गावातील लोकांना सोयीचा ठरत असल्याने बाजार येथेच भरला पाहिजे, अशी आग्रही आणि ठाम भूमिका मांडली.


मालवण सोमवार पेठेत भरणारा आठवडा बाजार कोरोना काळापासून देऊळवाडा सागरी महामार्गावर विभाजित करून भरविण्यात आला. मात्र देऊळवाडा येथे भरणारा आठवडा बाजार बंद करून तो पूर्वीप्रमाणेच सोमवार पेठेत एकत्रितरित्या भरविण्यात यावा अशी मागणी मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून नगरपालिकेकडे करण्यात आली होती. मात्र देऊळवाडा भागातील नागरिकांनी देऊळवाडा येथील बाजार सोमवार पेठेत हलविण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात नागरिकांनी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीसाठी देऊळवाडा भागासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.


देऊळवाडा येथे भरणारा आठवडा बाजार हा देऊळवाडा तसेच एसटी स्टॅन्ड परिसर, रेवतळे, वायरी, आडवण, आडारी या भागांसह बाजूच्या खैदा कातवड, कुंभारमाठ आदी गावातील नागरिकांसाठी सोयीस्कर असून बाजारात ये - जा करण्यासाठी सोयीचे पडत आहे. देऊळवाडा येथील बाजारापासून एसटी स्टॅन्ड तसेच रिक्षा स्टॅन्ड जवळ असल्याने बाजूच्या गावातील ग्राहकांना प्रवास खर्च देखील कमी येत आहे. या बाजारामुळे सोमवारपेठेत होणारी गर्दी व वाहतूक कोंडी कमी होत आहे. या बाजारामुळे देऊळवाडा येथे वाहतूक कोंडी होत असल्यास त्यावर मार्ग काढून वाहतूक सुरळीत करता येईल, अशी मते यावेळी उपस्थित नागरिकांनी मांडत देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये, अशी एकमुखी भूमिका घेतली. याबाबत मालवण नगरपालिकेला देखील देऊळवाडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांतर्फे निवेदन सादर करून देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये अशी आग्रही मागणी करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.


यावेळी गणेश गावकर, हरेश फणसेकर, पुनम चव्हाण, नीना मुंबरकर, जगदीश गावकर, सौगंधराज बादेकर, उत्सुक गावकर, ऍड. अक्षय सामंत, नामदेव घाडीगावकर, बंटी चव्हाण, पराग चव्हाण, भूषण चव्हाण, दशरथ कवटकर, भूषण म्हापणकर, किसन मांजरेकर, महेश गावकर, संकेत भाटे, शिवाजी म्हापणकर, पांडू फणसेकर, समीर शिंदे, केदार गावकर, नितीन तोडणकर, प्रथमेश मालवणकर, सुहास वालावलकर, राहुल केळुसकर, अक्षय माणगावकर, प्रमोद मराळ, मधुरा तुळसकर, राज मोंडकर, किरण चव्हाण, रवी मालवणकर, उमेश चव्हाण, कमा गावकर, ऍड. सुमित जाधव, सुभाष मालवणकर, दर्शन मुंबरकर, प्रमोद गावकर, हरेश मुंबरकर, दशरथ वालावलकर, मंदार गावकर, श्रेयस माणगावकर, विलास अभ्यंकर, गौरव लाड, सुहास गावकर, समीर वर्दम, शेखर केळुसकर, सोहम देऊलकर, शीला चव्हाण, विश्वास आचरेकर, सोमेश गावकर, राहुल वीर, चेतन वीर, युवराज गावकर, नागेश कांदळकर, दिनेश किडये, अभिषेक कांदळकर, सुशांत किडये, राजन गावकर, संतोष इब्रामपुरकर, रवी कासले, दिंगबर बगाड, रमाकांत फाटक, अमित बोर्डवेकर व इतर नागरिक, महिला आदी उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top