नगरसेवक मंदार ओरसकर, बबन वाघ यांचा यशस्वी पाठपुरावा
मालवण : प्रभाग क्रमांक 8 ब गवंडीवाडा मध्ये वीज समस्या होत्या. वीज खांबावरील वायर व साहित्य अनेक ठिकाणी खराब झाले होते. नागरिकांच्या समस्या बबन वाघ यांनी नगरसेवक मंदार ओरसकर यांच्याकडे पोहचवल्या. त्यानुसार MSEB च्या माध्यमातून जीर्ण वीज तारा व साहित्य बदलण्यात आले. कर्मचारी यांच्या कडून बदलून घेऊन त्या ठिकाणी वारंवार होणारी वीज समस्या दुर केली. याबाबत त्या परिसरातील नागरिकांनी नगरसेवक मंदार ओरसकर, बबन वाघ व MSEB कर्मचारी यांचे आभार मानले.

गवंडीवाडा परिसरातील वीज समस्या मार्गी..
