Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सोमवार पेठ येथील पारंपरिक आठवडा बाजार पूर्ववत एकत्र सुरु करावा

सोमवार पेठ येथील पारंपरिक आठवडा बाजार पूर्ववत एकत्र सुरु करावा


मालवण व्यापारी संघाची मागणी

युवा व्यापारी वर्गाने मांडली आक्रमक भूमिका

प्रशासन स्तरावर चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल ; नगराध्यक्षा, मुख्याधिकारी

मंगेश नलावडे | मालवण :
सागरी महामार्ग देऊळवाडा येथे अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे सोमवार पेठेतील व्यापारी, दुकानदार व भाजी विक्रेत्या यांचे मोठे नुकसान होत असून देऊळवाडा येथील आठवडी बाजार बंद करून पारंपरिक एकत्र आठवडा बाजार सोमवारपेठ येथे एकत्र पूर्ववत भरविण्यात यावा, याबाबत तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मालवण नगरपालिकेकडे केली.

मालवण शहरातील व्यापाऱ्यांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देऊन देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करण्याची मागणी आक्रमकपणे केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्याशी चर्चा केली. मालवण सोमवार पेठ येथे शिवकाळापासून आठवडा बाजार भरत आहे. सहा वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून देऊळवाडा येथेही आठवडा बाजार सुरु करण्यात आला. मात्र हा अनधिकृत बाजार अजूनही सुरु असून यामुळे सोमवार पेठ यां मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. महेंद्र पारकर व अन्य युवा व्यापारी यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडताना पुढचा आठवडा बाजार सोमवार पेठ येथे भरवावा अशी भूमिका मांडली.
यावर नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन प्रशासन स्तरावर चर्चा करून योग्य तो निर्णय लवकरात घेण्यात येईल, असे सांगितले.

आपली सोमवारपेठ मालवण बाजारपेठ कायम भरलेली राहावी हीच आपली भूमिका आहे. यासाठी आमदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल. भाजी मार्केटही लवकर पुर्ण केले जाईल. असे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगत सकारात्मक भूमिका मांडली.

यावेळी मुखाधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक मंदार ओरसकर, व्यापारी संघांचे पदाधिकारी हर्षल बांदेकर, नाना पारकर, नितीन वाळके, नितीन तायशेटये, रवी तळाशिलकर, हरेश देऊलकर,शेखर गाड,दिलीप बिरमोळे, राजेश सावंत, अभय कदम, गॅरी अन्नसियेशन, किसन मांजरेकर,जॉन नरोना यांसह व्यापारी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हर्षल बांदेकर, नाना पारकर, नितीन वाळके, नितीन तायशेटये यांनी यावेळी मालवण व्यापारी संघाची सविस्तर भूमिका मांडली.
मालवण नगरपरिषद, मालवण तहसील कार्यालय, मालवण पोलीस स्टेशनं, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय याठिकाणी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण हे ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. कित्येक वर्षांपासून सोमवार पेठ येथे आठवड्याचा मुख्य बाजार परंपरेने भरत होता. कोरोना काळात शासनाच्या निर्बंधांमुळे तात्कालीन नगराध्यक्ष व प्रशासनाच्या सूचनेनुसार हा बाजार तात्पुरता सागरी महामार्ग, देऊळवाडा येथे हलवण्यात आला होता. त्यावेळी त्यासाठी ठराविक मुदतही घालून देण्यात आली होती. परंतु कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतरही बाजार पूर्ववत सुरू करण्यात आला नाही.
सध्या सागरी महामार्गावर बाजार भरविल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत सोमवारी महामार्गावर बाजार भरल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो. मोठ्या वाहनांमुळे ट्रॅफिक जाम व लहान-मोठे अपघात होत आहेत. गावाबाहेरून येणाऱ्या लक्झरी बसेस मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी पार्क केल्या जातात. त्यामुळे बाजारासाठी आलेल्या जनतेला प्रचंड अडथळा होतो. बाहेरचे व्यापारी थेट महामार्गावर व्यापार करून निघून जातात. त्यामुळे बाहेरून आलेले ग्राहक मुख्य बाजारपेठेत येत नाहीत. याचा मालवणच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. मासे मार्केट, कोकणी मेवा व खेडेगावातून येणारा पारंपारिक भाजीपाला या सर्व वस्तू एकत्रित मिळण्याचे ठिकाण म्हणजे सोमवार पेठचा बाजार होता. त्यामुळे बाजारपेठ आठही दिवस गजबजलेली असे.
सध्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अत्याधुनिक पार्किंग तयार झाले असून जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी या ठिकाणीही बाजार भरत होता. तसेच नेरुरकर गल्ली, सकपाळ नाका गल्ली, सारस्वत बँक समोरील गल्ली येथे बाजार भरल्यास पूर्ण बाजारपेठ गजबजेल. नगरपालिकेने दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी केलेल्या पार्किंग व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण येणार नाही. मासे मार्केट जवळ असल्याने सर्व व्यवस्था सुलभ होईल व पर्यटकांनाही खरेदीसाठी सोयीचे होईल. यामुळे शहराची व्यावसायिक वाढ होऊन नगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल.

तरी मालवण शहरात सध्या दोन ठिकाणी भरत असलेला आठवडा बाजार बंद करून सोमवार पेठ येथील पारंपारिक आठवडा बाजार पूर्ववत एकत्रित सुरू करण्यात यावा. अशी भूमिका व्यापारी यांनी मांडली.


▪️ अमित खोत, मालवण

ruchira top