Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ पात्र घरेलू कामगारांना मिळणार संसारोपयोगी भांडी संच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ पात्र घरेलू कामगारांना मिळणार संसारोपयोगी भांडी संच


भारतीय मजदूर संघाचा सातत्यापूर्ण आणि यशस्वी पाठपुरावा

कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्या नंतर शासन स्तरावर यश

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत व पात्र असलेल्या ९१६ घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार मंत्री आकाश फुंडकर व राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्याजवळ केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या नंतर शासन स्तरावरून हे मोठे यश मिळाले आहे. घरेलू कामगार हिताच्या या महत्वपूर्ण
निर्णयानंतर येत्या काही दिवसात पात्र घरेलू कामगारांना भांडी संचांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे कोकण विभाग संघटन मंत्री श्री भगवान साटम व जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.
महाराष्ट्रभरात २०२४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी व नंतरही पात्र घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संचांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांमध्ये हे वाटप अपूर्ण राहिले होते. भारतीय मजदूर संघाने हा अन्यायकारक प्रकार गांभीर्याने घेत कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत भांडी संच तातडीने मंजूर करण्याची आग्रही मागणी केली होती.​मंत्री महोदय यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शासनाने तात्काळ कार्यवाही सुरू करत सिंधुदुर्गातील पात्र ९१६ कामगारांना संसार उपयोगी भांडी संच मंजूर केले आहेत.
हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी व घरेलू कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर, पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय सचिव श्री. अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री श्री. किरण मिलगीर, आणि प्रदेश सचिव श्री. हरी चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहकार्याबद्दल भारतीय मजदूर संघ व घरेलू कामगार संघाच्या वतीने दोन्ही मंत्री यांची भेट घेऊन त्यांचे अधिकृत आभार व्यक्त करण्यात येणार असल्याचे श्री. भगवान साटम व श्री. हेमंत कुमार परब यांनी सांगितले.

पात्रतेच्या अटी व महत्त्वाचे आवाहन

​दिनांक ३१ जुलै २०२४ पूर्वी ज्या घरेलू कामगारांची अधिकृत नोंदणी झालेली आहे आणि ज्यांची नोंदणी सध्या जीवित आहे, अशाच घरेलु कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या घरेलु कामगारांची नोंदणी मुदत संपली असेल, त्यांनी आपल्या नोंदणीचे तातडीने नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव श्री. हेमंत कुमार परब यांनी केले आहे. ज्या कामगारांनी घरेलू कामगार कल्याण मंडळासोबतच 'बांधकाम कामगार मंडळा'तही नोंदणी केली असेल, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे श्री. परब यांनी स्पष्ट केले.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top