नगरसेवक मंदार ओरसकर, बबन वाघ व नगरपालिका स्वच्छता विभागाचे मानण्यात आले आभार
मालवण : मालवण शहर प्रभाग क्रमांक 8 ब मधील गवंडीवाडा मार्गलगत आशा पार्क शेजारी वाढलेल्या झाडीमुळे बाजूच्या घरातील नागरिकांना सरपटणारे प्राणी, डास, कीटक यांचा त्रास होत होता. याबाबत नागरिकांची समस्या बबन वाघ यांनी नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरपरिषद माध्यमातून सफाई कर्मचारी यांना घेऊन त्याठीकाणची सफाई करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
समस्येची दखल घेऊन ती तात्काळ सोडवल्याबद्दल नगरसेवक मंदार ओरसकर, बबन वाघ व नगरपालिका कर्मचारी यांचे आभार माणण्यात आले आहेत.

गवंडीवाडा परिसरात आशा पार्क शेजारी वाढलेल्या झाडीची समस्या मार्गी
