Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सोने तारण फसवणूक प्रकरणातील पीडितांची मालवण पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार

सोने तारण फसवणूक प्रकरणातील पीडितांची मालवण पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार


संबंधित वित्तीय संस्थेच्या शाखेत छेडले ठिय्या आंदोलन


मालवण |प्रतिनिधी : मालवण मधील एका वित्तीय संस्थेकडून सेफ्टी डिपॉझिट योजनेच्या नावाखाली ग्राहकांच्या झालेल्या कथित आर्थिक फसवणूक व सोने तारण कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील पीडितांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेत मालवण पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दिली. दरम्यान, आर्थिक फसवणूक व सोने तारण कर्ज गैरव्यवहार झाल्याचे सांगत संबंधित वित्तीय संस्थेच्या शाखेत ठिय्या आंदोलन छेडले.

मालवणातील एक वित्तीय संस्थेकडून काही ग्राहकांची सोने कर्जच्या नावाखाली आर्थिक फसवणूक व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मालवण शहर व ग्रामीण भागातील पीडित नागरिकांनी वित्तीय संस्थेच्या शाखेत धडक दिली. "जोपर्यंत आमचे दागिने परत मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही," अशी भूमिका घेत शाखेतच ठिय्या आंदोलन सुरू केले.

याबाबत ग्राहकांनी मालवण पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले आहे. वित्तीय संस्थेच्या काही एजंटांनी आमचा विश्वास संपादन करत सेफ्टी डिपॉझिट योजनेअंतर्गत बँकेत दागिने सुरक्षित ठेवले जातील, त्यावर आकर्षक व्याज मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. काही दिवस ही योजना सुरळीत चालल्यानंतर व्याज देणे बंद करण्यात आले, "दागिने कुठे आहेत आम्हाला माहिती नाही, तुमच्या नावावर जे दागिने दिसत आहेत तेच तुमचे समजा, ते सोडवा, नाहीतर दागिने लिलावात जातील" अशी भीती दाखविण्यात आली असे ग्राहकांनी निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कागदपत्रामध्ये फेरफार करण्यात आले, त्यामुळे ग्राहकांच्या मूळ दागिन्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, त्यामुळे संबंधित संस्थेची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
यावेळी नगरसेवक विकी तोरसकर यांच्या सोबत कविता मोंडकर, रुपेश प्रभू, दिलीप घारे, कांचन धुरी, सेजल परब, सिया धुरी, माधुरी प्रभू, प्रियल खवणेकर, अक्षता आडकर, ममता कुबल, महिमा प्रभू, रुपेश धुरी, श्रीकृष्ण आडकर, भार्गव खराडे, नारायण आडकर, दाजी जोशी यांसह इतर उपस्थित होते. यासोबत मालवण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील सोने तारण गैरव्यवहार प्रकरणातील अनेक पीडित नागरिक सहभागी झाले होते.

ruchira top