Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

शिवसेना पेंडूर, सुकळवाड जि.प. मतदारसंघाची बीएलए आढावा बैठक संपन्न

शिवसेना पेंडूर, सुकळवाड जि.प. मतदारसंघाची बीएलए आढावा बैठक संपन्न


मालवण-कुडाळ विधानसभा बीएलए समन्वयक काका कुडाळकर यांची उपस्थिती :

राजू गावडे, शेखर फोंडेकर यांची बीएलए समन्वयकपदी नियुक्ती ; गोळवण येथील उबाठा कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पेंडूर व सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील बीएलए-2 यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मालवण तालुका शिवसेना वतीने आयोजित बैठक मालवण-कुडाळ विधानसभा बुथ लेवल एजंट (बीएलए) समन्वयक काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत बीएलएच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच मतदान केंद्रांवर शंभर टक्के काम पूर्ण करून ते शिवसेना एसआयआर ॲपवर अपलोड करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर शिवसेनेला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. दरम्यान गोळवण येथील उबाठा कार्यकर्ते अनाजी (पप्पी) मुणगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सुकळवाड जिल्हा परिषद सदस्या सौ. सुमेधा पाताडे, पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, विभागप्रमुख सौ. मयुरी घाडीगावकर, दादा नाईक, विभागप्रमुख किरण प्रभू, उपतालुकाप्रमुख आतिक शेख, भाऊ चव्हाण, दया देसाई, बाबली पालव, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, देवली उपसरपंच हेमंत चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व बीएलए-2 उपस्थित होते. पोईप–मसदे शाखाप्रमुख विलास पांजरी यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
बैठकीत काका कुडाळकर यांनी पक्ष स्तरावरील बीएलए यांचा कामाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. विविध बीएलएंनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण यावेळी करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहनही करण्यात आले.

बीएलए समन्वयक नियुक्ती

यावेळी सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघासाठी बीएलए समन्वयक म्हणून राजू गावडे, तर पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी शेखर फोंडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच काही मतदान केंद्रांसाठी नव्याने बीएलएची नियुक्तीही जाहीर करण्यात आली आहे. याबाबत माहिती शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी दिली.


▪️अमित खोत | मालवण

ruchira top