आंदोलनात मालवणमधून सहभागी झालेल्या युवा वर्गाचा मालवण तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार...
युवा शक्तीच्या जोरावर न्याय मिळवून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त...
मालवण | प्रतिनिधी: दिल्ली, जंतर मंतर येथील NEET पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या वर कारवाई व्हावी यासाठी युवा वर्गाने छेडलेल्या आंदोलनात मालवणमधून सहभागी झालेल्या युवा वर्गाचा मालवण तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान NEET पेपर फुटी प्रकरणी छेडलेल्या आंदोलनात युवा वर्गावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला होता त्या पोलीस अधिकारी वर्गाचा मालवण काँग्रेस च्या वतीने काँगेस जिल्हा अध्यक्ष अरविंद मोडकर यांनी निषेध व्यक्त केला.
मालवण बांगीवडा येथील समाज मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ मेणबत्ती पेटवून युवा वर्गाला सविधानाने न्याय व युवा शक्तीच्या जोरावर न्याय मिळवून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी मालवण मधून या युवा आंदोलन मोर्चात सहभागी झालेल्या मेगल डिसोझा व राहुल जाधव यांचा मालवण तालुका काँग्रेस च्या वतीने सन्मान करण्यात आला व या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक युवकाच्या वतीने त्यांनी हा सन्मान स्विकारला.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस देवानंद लुडबे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बाळू अंधारी, काँग्रेस तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अल्प संख्याक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, ओबीसी तालुका अध्यक्ष प्रवीण आचरेकर, आपा चव्हाण,चंदन पांगे, महिला तालुका अध्यक्ष प्राची माणगांवकर, शहर अध्यक्ष रुपाली फर्नाडिस, स्नेहल मेथर, अमृता मोडकर, पराग माणगांवकर आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण | काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल युवा शक्तीचे कौतुक...
