Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवणात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाई मंदिरांत भक्तिमय उत्सव

मालवणात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाई मंदिरांत भक्तिमय उत्सव


दांडी भक्ती सागरात चिंब : खैदा येथील 'प्रती पंढरपूर' मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी

मालवण | प्रतिनिधी : "जय जय विठ्ठले रखुमाई... जय जय विठोबा रखुमाई..." या विठुरायाच्या अखंड नामगजरात मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवर आषाढी एकादशीनिमित्त भव्य वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. श्रीकृष्ण मंदिर ते श्री मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) आणि तेथून दांडेश्वर मंदिरापर्यंत निघालेल्या या दिंडीत शेकडो वारकरी व भाविक सहभागी झाले होते. ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण किनारपट्टी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात सकाळी ६ वाजल्यापासून पूजाअर्चा, नामस्मरण, भजन व आरतीचे कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी ३ वाजता ढोल-ताशांच्या गजरात वारकरी दिंडीला प्रारंभ झाला. दांडी ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक टाळ-मृदुंगाच्या साथीने हरिनाम गात दिंडीत सहभागी झाले होते.

श्रीकृष्ण मंदिरातून निघालेली दिंडी श्री मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे पोहोचली. तेथे ग्रामस्थांनी नवसपूर्ती व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर दिंडी दांडेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी विविध पारंपरिक वेशभूषा, हाती भगव्या पताका व ध्वज घेतलेली लहान मुले, तसेच अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. हरिनामाचा अखंड गजर आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने दांडी किनारपट्टीवर वारकरी संप्रदायाचा भक्तिमय सोहळा अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, मालवण तालुक्यातील ग्रामदैवत व 'प्रती पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खैदा येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातही आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासून विधिवत पूजाअर्चा, हरिनाम सप्ताह, वारकरी भजने व धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात संपन्न झाले.
याशिवाय मालवण मेढा, देऊळवाडा, गवंडीवाडा, धुरीवाडा आदी भागांतील श्री विठ्ठल-रखुमाई व श्रीकृष्ण मंदिरांमध्येही आषाढी एकादशी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसाभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजने, कीर्तन आणि नामस्मरणात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ruchira top