जनतेच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे सेवेत हजर
मालवण नगरपरिषद महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांनी आमदार निलेश राणे यांचे जनतेच्या वतीने मानले आभार
मालवण : कार्यतत्पर आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठवुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ हे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी पदभार स्वीकारत रुग्ण सेवेत हजर झाले.
आमदार निलेश राणे जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे नेतृत्व आहेत. जनतेच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सेवेत हजर होत पदभार स्वीकारला आहे.
याबाबत भाजपा महिला शहराध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांनी आमदार निलेश राणे तसेच महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर, पालकमंत्री नितेश राणे या सर्वांचे अन्वेशा आचरेकर यांनी जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

आमदार निलेश राणे जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे नेतृत्व!
