मालवण नगरपरिषद नगरसेविका तथा महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांसह भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित
मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ नियुक्तीबाबत आमदार निलेश राणे यांचे मानले आभार
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठवुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ हे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी पदभार स्वीकारत रुग्ण सेवेत हजर झाले.
यावेळी भारतीय जनता पार्टी मालवण नगरसेविका व महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांसह भाजपा पदाधिकारी सेजल परब, महिमा मयेकर, दर्शना कासवकर, दिव्या कोचरेकर, महानंदा खानोलकर, तारका चव्हाण, अमृता फाटक, संतोषी कांदळगावकर, पूजा वेरलकर यांच्या वतीने स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पाटील हे ही उपस्थित होते.

स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांचा स्वागत सत्कार
