मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण भाजपचे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालय येथे आयोजित महारक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदाते यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना आभार व्यक्त करण्यात आले. 


यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विलास हडकर, तालुका उपाध्यक्ष केदार झाड, मनोज मेतर, उपसभापती शाम झाड, पंचायत समिती भाजपा गटनेते दिपक सुर्वे, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर प्रभारी पंकज सादये, नगरसेवक मंदार केणी, महिला शहर अध्यक्ष तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, भाई सावंत, युवामोर्चा शहरअध्यक्ष नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, पस सदस्य योजना कांबळी, तारका चव्हाण, अमृता फाटक, पुजा वेरलकर, संतोषी कांदळकर, बबलु राऊत, बंडू गावडे, अरुण मेस्त्री, विजय निकम, सुशील गावडे, सहदेव साळगावकर, दाजी सावजी, समीर बावकर, देवानंद लोकेगांवकर, मिथिलेश मिठबावकर, रोहेश गांवकर, दिव्या कोचरेकर, यांसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाबँक संचालक बाबा परब यांनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदात्याना प्रमाणपत्र प्रदान केले. या रक्त दान शिबिरास एसएसपीएम हॉस्पिटल पडवे यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती भाजपा शहर प्रभारी पंकज सादये यांनी दिली.
▪️अमित खोत, मालवण

