नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांसह नगरसेवक व पदाधिकारी यांच्याकडून स्वागत
आमदार निलेश राणे यांसह महायुती सरकारचे सर्वांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठवुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ हे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी पदभार स्वीकारत रुग्ण सेवेत हजर झाले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांसह नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवसेना, भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रशांत बागडे हे गेली 9 वर्षे विविध रुग्णालयात रुग्णसेवा करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथून त्यांनी सेवेची सुरवात केली. त्यानंतर सायन हॉस्पिटल मुंबई, महिला रुग्णालय सोलापूर येथे त्यांनी सेवा दिली आहे.
आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून मतदारसंघातील आरोग्यस्थितीचा अहवाल सादर केला होता. जनतेला आरोग्य सेवेच्या दृष्टीने मालवण शहरातील ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती मांडत या रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालय म्हणून दर्जा देत सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्काळ उपाययोजना करत स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे, बाल रोग तज्ञ यांची मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती करण्यात आली.
स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी पदभार स्वीकारत रुग्ण सेवेत हजर झाले. डॉ. प्रशांत बागडे मालवण ग्रामीण रुग्णालय येथे अन्य डॉक्टर यांच्या सोबत रुग्णसेवा बजावणार आहेत. सोबत दर बुधवारी गरोदर माता तपासणी, प्रत्येक महिना 9 तारीख प्रधानमंत्री मातृ सुरक्षा दिन जोखमीच्या गरोदर माता तपासणी व उपचार तसेच आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी रजोनिवृत्ती क्लिनिक 45 वर्षा वरील महिलांसाठी त्यांच्या समस्या व निराकरण केले जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील उपस्थित होते.
डॉ. प्रशांत बागडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कांदळगांवकर, भाग्यश्री मयेकर, निना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर यांसह शिवसेना तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, मार्टीन फर्नांडिस, लुड्डीन फर्नांडिस, यांसह भाजपा पदाधिकारी पुजा वेरलकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, अमृता फाटक, संतोषी कांदळगांवकर, दिव्या कोचरेकर आदी उपस्थित होते.
जनतेला अधिकाधिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील आहेत. त्यांच्या अनुषंगाने मालवण ग्रामीण रुग्णालय येथील रिक्त पदावर डॉक्टर नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत आमदार निलेश राणे यांसह महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर, पालकमंत्री नितेश राणे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
▪️अमित खोत, मालवण

स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात येथे पदभार स्वीकारला
