Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये

देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये


शिवसेना मालवण महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका निना मुंबरकर यांसह नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन

मालवण | प्रतिनिधी:
मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सोमवारी भरत असलेला आठवडा बाजार बंद करण्यात येऊ नये. या मागणीचे पत्र शिवसेना मालवण महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका निना मुंबरकर यांसह नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष सौ. ममता मनमोहन वराडकर यांना देण्यात आले.

यावेळी मालवण नगरपरिषद समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नंदिता हडकर, प्रसन्ना तुळसकर, रश्मी तुळसकर, दिनेश किडये, किरण राठोड आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, देऊळवाडा येथे गेल्या काही वर्षांपासून सोमवारी आठवडा बाजार भरत असून, तो मालवण शहरासह वायरी, कुंभारमाठ, आडारी, कोळंब, घुमडे आदी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा ठरत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व आसपासच्या गावांतील नागरिकांना या बाजाराचा मोठा लाभ होत आहे.
देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करण्याबाबत शासन स्तरावर निवेदन देण्यात आल्याचे समजत असल्याने नागरिकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. बाजारामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यास त्यावर पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

सोमवारी बाजाराच्या दिवशी पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देणे, रस्त्यालगत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी निश्चित बैठक व्यवस्था व नियमावली तयार करणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर ठराविक वेळेस निर्बंध घालणे तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक नियोजन करणे, अशा उपाययोजनांचा विचार करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सार्वत्रिक लोकहिताचा विचार करून देऊळवाडा येथील सोमवारी भरणारा आठवडा बाजार बंद करू नये, तसेच याबाबत तहसीलदार, मालवण आणि मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना पाठवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती नागरिकांनी नगराध्यक्षांकडे केली आहे.

ruchira top